शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

बोदवडमध्ये मोहरमला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 19:27 IST

हिंदू मुस्लीम बांधवांच्या एकात्मतेची १२० वर्षांची परंपरा असलेल्या मोहरम पर्वाला बुधवारपासून झाली आहे.

ठळक मुद्देएकतेचे प्रतीकहिंदूच्या १२०, तर मुस्लीम बांधवांच्या ८० सवाऱ्याचार दिवस चालणाºया उत्सवावर यंदा कोरोनाचे सावटचाकोरीबद्ध पद्धतीत करावा लागणार पर्व

गोपाळ व्यासबोदवड : हिंदू मुस्लीम बांधवांच्या एकात्मतेची १२० वर्षांची परंपरा असलेल्या मोहरम पर्वाला बुधवारपासून झाली आहे. मोहरम हा मुस्लीम समाज बांधवांचा पहिला महिना आहे. या महिन्याच्या मुस्लीम तारखेनुसार हजरत इमाम हसन हुसैन यांच्या आठवणींचा हा महिना असून, यात बोदवड शहरात त्यानिमित्त सवाºया (छडी) बसवण्याची परंपरा आहे.चार दिवस चालणाºया या उत्सवात शहरात ठिकठिकाणी घरादारापुढे मांडव टाकतात. सुवासिक काठीला रेशमी कापड परिधान करून त्यावर चांदीचा नाल बसवला जातो. त्यावर चंदन, गुलाब पाणी, अत्तर, अभिर व लोभानच्या सुगंध लावला जातो. नंतर या (छडी) सवाऱ्यांची चौरंगवर बसवून सवाद्य मिरवणूक काढली जाते. यात पहिली मिरवणूक पहिल्या रात्रीला, तर मोहरमच्या ९ तारखेला दुसरी, तसेच मोहरम ताजिया मोहरमच्या १० तारखेला काढली जाते. शेवटच्या मिरवणुकीने समारोप होतो. ही मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी उसळते.मोहरमनिमित्त दरवर्षी शहरात आप्तेष्ठ, नातेवाईक मुंबई, सुरत, नांदुरा, मलकापूर, बºहाणपूर येथून न चुकता शहरात दाखल होत असतात. त्यामुळे चार दिवस जणू यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप आलेले असते. काहींचे नवस, मनोकामना पूर्ण झाल्यावर या सवाºयांपुढे फेडतात. यासाठी काही अत्तर, चादर, चांदी, खोबरे, गुळ या प्रकारे नवस फेडतात. ही परंपरा गेल्या १२० वर्षांपासून शहरात सुरू आहे.शहरात बसवल्या जाणाºया या सवाºयांमध्ये सर्वाधिक सवाºया या हिंदूंच्या १२०, तर मुस्लीम बांधवांच्या ८० अशा या २०० सवाºया शहरात बसतात. त्यांची रीतसर नोंदही पोलीस ठाण्याला ठेवण्यात आलेली असते. यंदा मोहरमचे हे पर्व २७ आॅगस्टपासून सुरू होऊन ३० रोजी संपणार आहे. शेवटची मिरवणूक गांधी चौक, गोदडशहा बाबांच्या दर्ग्यात करबला करून समाप्त केली जाते.काही आहे मानाच्या तर काही उच्च शिक्षितांच्या सवाºयाशहरात बसणाºया या सवाºयांमध्ये काही मानाच्या सवाºया आहेत. त्यांची भगत मंडळी ही उच्च शिक्षित तसेच काही सरकारी नोकरदार आहे, तर काही वकील तर शिक्षकही आहे, मारवाडी समाजबांधवही आहेत.भास्कर, सलाम, देवीदास, गोपाल गुरुजी, सुभान बाबा मिया, गजू, अमीर, पप्पू, बुना, सूरज, मनोहर कंडक्टर, ताहेर, अमीर, गुड्डू, कय्या, नईम, संतोष भिल, आकाश, राहुल, सागर, लोकेश, अमृत, जगदीश, श्रावण, रणजित, असिफ अशी भगत मंडळी आहे.यंदा कोरोनाचे सावट असल्याने पारंपरिक हा सण अडचणीत सापडला आहे. मिरवणुकीवर बंदी लावण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळत मास्क वापरणे हे बंधनकारक असणार आहे. जमावबंदी आदेश लागू असल्याने त्याची अंमलबजावणीही करण्यात येणार आहे. परिणामी चाकोरीबद्ध पद्धतीत हा सण साजरा करावा लागणार आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBodwadबोदवड