रावेर : चंद्रभागेच्या वाळवंटात पांडुरंगाच्या चरणी कॅन्सरपीडित महिलेने चिठ्ठीसह काही वर्षापूर्वी अर्पित केलेल्या मूक-बधिर लेकीचा बुधवारी रावेर येथे टेलरिंगचा व्यवसाय करणा:या मूकबधिर योगेश देवीदास सैतवाल (भाटखेडा) याच्याशी साखरपुडा झाला. जळगावला आगामी काळात हा विवाह होणार आहे. यात राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते तिचे कन्यादान करण्यात येणार आहे. 1935 मध्ये फैजपूरच्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी संत गाडगेबाबांनी प्रदान केलेल्या कांबळाची घोंगडी वधू-वरांच्या माथ्यावर ठेवण्यात आली. पीपल्स बँक सभागृहात हा कार्यक्रम झाला. जात-पात, उच्च-नीच, गरीब-श्रीमंतीच्या भेदभावाला छेद देऊन मानवता या एकमेव धर्मातून आयोजित केलेल्या या साखरपुडा सोहळय़ास माजी आमदार अरुण पाटील, शंकरबाबा पापळकर, उपनगराध्यक्ष सुधीर पाटील, जैन समाज मंडळाचे अध्यक्ष उज्ज्वल डेरेकर, संयोजक प्रताप दगडू जैन, वरपिता देवीदास शांताराम जैन, अमरावतीच्या देवकीनंद गोपाला शिक्षण संस्थेच्या संचालिका आशाबाई कारबांडे, अंबादास वैद्य दिव्यांग बालगृहाच्या संचालिका प्रमिला नगाट आदी उपस्थित होते. नंदकुमार सैतवाल यांनी पौरोहित्य केले. सुभाष पाटील, मदन सैतवाल, नारायण डेरेकर, दत्ता डेरेकर, रवींद्र जैन, संदीप जैन, नीलेश जैन, सुरेश महाजन, आर.के.पाटील, विलास जैन, नेमीनाथ जैन, अनुप जैन, वसंत जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
मूकबधिर मंगल-योगेशचा झाला वा्निश्चय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2017 1:12 AM