माङो एक नावाजलेले वकील मित्र होते. 1981 ते 1985 या दरम्यान ते वकिली करीत होते. 85ला त्यांचं दुर्दैवानं निधन झालं. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या प}ीला बँकेतून एक रूपयादेखील काढता येत नव्हता. कारण मृत्यूपूर्वी त्यांनी कुठलेही व्यवस्थापन केलेले नव्हते. नंतर त्यांच्या प}ीला कोर्टाच्या फे:या माराव्या लागल्या. दोन ते तीन लाख रुपये स्टॅम्प डय़ूटी भरून आपलेच पैसे काढता आले. दुसरी अशीच एक घटना आहे. माङो एक डॉक्टर मित्र एकदा माङयाकडे आले आणि म्हणाले, ‘आमच्या वडिलांची प्रॉपर्टी आहे नंदुरबार जिल्ह्यात, पण त्याचा सात-बाराचा उतारा नाही आमच्याकडे. तेव्हा ही प्रॉपर्टी आमच्या नावे कशी करता येईल?’ त्यांना वडीलांच्या निधनानंतर खूप फिरावे लागले. नंदुरबार जिल्ह्यात त्यांच्या वडिलांचे 45 प्लॉटस निघाले. या दोन घटनांवरून आपल्या लक्षात आलेच असेल की, मृत्यूपूर्वी मृत्यूपत्र बनविणे किती महत्त्वाचे आहे ते. मृत्यूपत्र केलं नाही तर संपत्तीचं नीट व्यवस्थापन होत नाही. मृत्यूपत्र करण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमच्या संपत्तीचं डिस्क्रिप्शन त्यात दिलं जातं. त्यामुळे कायद्याने वारशांची जी साखळी लावलेली आहे ती तुम्हाला तोडता येते. मृत्यूपत्र करताना ती व्यक्ती सज्ञान असली पाहिजे. त्या व्यक्तीला पूर्ण समज असली पाहिजे की, ती व्यक्ती नेमके काय करत आहे, काय लिहून देत आहे? महत्त्वाचे म्हणजे मृत्यूपत्र लिहून देणारी व्यक्तीची संपत्ती त्याची स्वकष्टार्जित असली पाहिजे. तुमची वडिलोपार्जित संपत्ती असेल आणि त्याची मृत्युपत्रात नोंद नसेल तर त्याचा अर्थ असा होतो की, त्या संपत्तीचे तुमच्या परिवारातील सर्वच सदस्य हक्कदार आहेत.सध्या जीवनशैली बदलल्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलंय आणि ते अवेळी येते म्हणून असे म्हणणे थोडे चुकीचे ठरेल की, मी तर अजून चाळीशीत किंवा पन्नाशीत आहे. मृत्यू हा सांगून नाही येत. म्हणून ज्या क्षणी तुमच्या मनाला आणि मेंदूला वाटते की मृत्यूपत्र बनविले पाहिजे, ते बनवून ठेवा. मृत्यूपत्र कितीही वेळा बनविता येते. त्यात बदल करता येतो. मात्र तुमचे शेवटचे मृत्यूपत्रच गृहीत धरले जाते. दुसरे असे की, खरेदी खत किंवा बक्षिसाप्रमाणे मृत्यूपत्र नोंदविणे अजून तरी भारतीय कायद्यात बंधनकारक नाही. मृत्यूपत्र स्टॅम्प पेपरवरच नोंदविले पाहिजे, असे काही महत्त्वाचे नाही. अगदी को:या कागदावरसुद्धा तुम्ही मृत्यूपत्र नोंदवू शकता. मात्र त्यासाठी कमीत कमी दोन साक्षीदार असणे आवश्यक आहे. साक्षीदारांसाठीदेखील तेच नियम लागू आहेत की, ते सज्ञान असले पाहिजे, ते वेडे नसले पाहिजे, काय लिहून घेत आहोत याची त्यांना पूर्ण समज असली पाहिजे. आणखीन महत्त्वाचे म्हणजे ज्याच्या नावे मृत्युपत्रात संपत्ती दिली आहे तो साक्षीदार म्हणून चालत नाही. कारण अशा प्रकारच्या केसेसमध्ये अनेक आशंका आणि घोटाळे निर्माण होण्याची शक्यता असते. साक्षीदार घेताना ब:याचदा आपण वरिष्ठ लोकांना म्हणजेच साठी पार केलेल्या व्यक्तींना साक्षीदार बनवितो. दुर्दैवाने आपल्या आधीच ते जग सोडून निघून जातात. म्हणून साक्षीदार निवडताना आपल्या नात्यातील, विश्वासातील, परिचयातील तरुणांना साक्षीदार म्हणून निवडा. मृत्युपत्रात तुम्ही कोणत्याही अटी टाकू शकतात परंतु त्या कायद्यात बसल्या पाहिजेत. सट्ट्य़ाच्या, दारूच्या धंद्यासाठी प्रॉपर्टी चालणार नाही. मृत्यूपत्र करण्यासाठी कुठलाही कर लागत नाही. तुम्ही तुमच्या कष्टाने कमविलेल्या संपतीचे लिखित मृत्यूपत्र तुमच्या सोयीनुसार लिहून घेऊ शकतात, त्यात बदल करू शकतात. मृत्युपत्रासारख फ्लेक्जिबल डॉक्युमेंट भारतीय कायद्यात कुठलेच नाही. ( क्रमश:)
ज्या क्षणी मनात येते तेव्हा बनवा तुमचे मृत्यूपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 1:20 AM