पोलीस गिरणा नदीत दाम्पत्याचा शोध घेत असताना गिरणा-तितूर नदीच्या संगमावर मोठा डोह आहे व तेथे आत्महत्या किंवा बुडून मृत्यू झाल्याची घटना सतत घडत असल्याचे पोलिसांना समजले. ते ठिकाण गाठत असताना अवघ्या एक मिनिटाच्या अंतरावरच दोघांना पोलिसांनी अडविले. दोघंही जीवन संपविण्यावर ठाम असल्याने पोलिसांनी मुलाला व्हिडीओकॉल केला, तो मम्मी, पप्पा परत या ना...अशी विनवणी करुन आर्त हाक देत होता, परंतु तरी देखील दाम्पत्य ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. कशीतरी दोघांची समजूत काढली अन् त्यांना घरी आणले. गुरुवारी पोलिसांनी कुटुंबात समेट घडवून आणला.
कोट..
मुलाला आई, वडील मिळवून देण्यासह दोघांचा जीव वाचविल्याचे सर्वात मोठे काम आमच्या हातून झाल्याचे समाधान आहे. आईला दवाखान्यात सोडून तसाच धावपळ करुन गेलो. वेळोवेळी यंत्रणेचीही तात्काळ मदत मिळाल्याने हे शक्य होऊ शकले.
-राहूल बेहरे, पोलीस अमलदार