रस्त्यावर कसरत
जळगाव : जिल्हा परिषदेसमोरील रस्ता खोदण्यात आल्याने या ठिकाणी मोठा खड्डा खोदून त्यात पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, जुन्या इमारतीत येण्यासाठी अगदी छोट्याशा वाटेतून रस्ता काढावा लागत असल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे.
नातेवाइकांची गर्दी वाढली
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे. आपत्कालीन कक्षाबाहेर अनेक नातेवाईक सतत उभे असतात. शनिवारी आपत्कालीन कक्षाच्या अतिदक्षता विभागाबाहेर काही नातेवाइकांची गर्दी होती. दरम्यान, नातेवाईक थेट कक्षाजवळ येत असल्याने संसर्गाचा धोका अधिक असल्याचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे.
नियमांना हरताळ
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ असून, शिवाय मुख्य गेट असल्याने यातून केवळ रुग्णवाहिका आत येतील, असे नियम बनविण्यात आले होते. मात्र, मुख्य इमारतींसमोर दुचाकींची जत्रा भरलेली व नातेवाइकांची प्रचंड गर्दी होत असल्याचे गंभीर चित्र आहे.