आडगाव ता.चाळीसगाव : गेल्या दीड महिन्यापासून कर्जमाफीसाठी राजकारण सुरु आहे. आज कर्जमाफी होईल, उद्या होईल अशी अपेक्षा करीत मार्च संपला व एप्रिल महिना सुरु होऊनही शेतकरी अद्यापही विकास सोसायटी, बँकांकडे फिरकलेला नाही असे चित्र दिसत आहे. दरवर्षी ७०-८० टक्के वसुली होत असे. ती यंदा केवळ २०-३० टक्के झाली आहे असे गटसचिव तसेच बँकिंग अधिकाºयांनी सांगितले. मात्र कर्जमाफी होणार नाही म्हणून वसुलीसाठी परिपत्रक काढल्याचेही या अधिकाºयांनी सांगितले.नियमित कर्ज भरणाºयांना लाभ कमी, थकबाकीदार मात्र मजेत नियमित कर्ज भरणाºयांंची संख्या अधिक व लाभ कमी तर थकबाकीदारांची संख्या कमी मात्र त्यांना लाभ जादा असा आजवरचा अनुभव आहे. कारण सर्वसाधारण शेतकरी अल्पभूधारक हा नियमित कर्जपुरवठा घेतो व वेळेवर फेडतो. मोठे व सधन शेतकरी जादा कर्ज घेतात व वेळेवर कर्जफेडही करीत नाहीत. असे शेतकरी थकबाकीदार होतात मग जे थकले त्यांनाच कर्जमाफी होते व जे नियमित हप्ते भरतात त्यांना काहीही लाभ मिळत नाही. यासाठी शासनाने कर्जमाफी केली तर ती सरसकट व्हावी अशीमागणी शेतकरीवर्ग करीत आहे. कर्ज माफ होईल अशी अपेक्षा रोज शेतकºयांना असून ते आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र मार्च संपून एप्रिल महिना उजाडला तरी सरकारकडून कोणतीही हालचाल दिसून येत नाही. केंद्राने याबाबत जबाबदारी झटकली असून हात वर केले आहेत. कर्जमाफीचा निर्णय राज्यानेच घ्यावा असे सांगण्यात आले आहे. यामुळे कर्जमाफीचा निर्णय सध्यातरी अधांतरीच आहे असे म्हणावे लागेल.कर्जपुरवठ्याची मर्यादा वाढवावीकर्जमाफी होणार नाही हे जवळपास निश्चित मानले जात आहे. दरवर्षानुसार यंदाही ३१ मार्चपूर्वी शेतकºयांनी कर्ज भरावे असे परिपत्रकदेखील बँकांकडून, विकास सोसायट्यांकडून काढण्यात आले आले होते. मात्र कर्जमाफी होणार या आशेवर शेतकºयांनी कर्जाचा भरणा करण्यास अनुत्सुकता दाखवली आहे.उत्तर प्रदेश सरकारने शेतकºयांना कर्जमाफीची घोषणा केली. आता महाराष्ट्रातील शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या असून राज्य शासनाच्या भूमिकेकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे. एप्रिल महिन्याचा आठवडा संपत आला तरीही शेतकºयांची कर्ज भरण्याविषयी अनास्था दिसून येत आहे. एवढे कर्जवाटप मागील वर्षी सदर सोसायट्यामार्फत शेतकºयांना झाले आहे. गतवर्षी दुष्काळ असूनही सोसायट्यांची वसुली जवळपास ७० टक्के झाली होती. यावर्षी मात्र सरकार व विरोधी पक्षाकडून वारंवार कर्जमाफीची मागणी होत असल्याने शेतकºयांनादेखील यंदा कर्जमाफीची अपेक्षा असल्याने कर्जभरणा मार्चअखेरपावेतो केवळ २० ते ३० टक्केच झाला असे सोसायटींचे सचिव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वि.का.सोसायट्यांमध्ये पैशांचा ठणठणाट
By admin | Published: April 06, 2017 12:49 AM