संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : शासनाच्या मोफत एसटी पास योजनेच्या नावाखाली मुलींकडून २० रुपये घेतल्याचे चौकशीत आढळून आल्याने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका व लिपिकावर संस्थेने कारवाई करण्याचे निर्देश माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी दिले आहेत.शहरातील डी.आर.कन्याशाळेत विकास निधीच्या नावाखाली ४०० रुपये, तर मोफत पासच्या नावाने २० रुपये घेतल्याची तक्रार रासपच्या युवती जिल्हाध्यक्षा ज्योती भोई यांनी केली होती. त्यावर मुलींनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशीत २० रुपये दिल्याचे सांगितले. यामुळे शाळेत कर्तव्यात कसूर केला म्हणून मुख्याध्यापिका जयश्री सोनवणे, लिपिक श्याम पवार यांच्यावर आरटीइ कायद्याप्रमाणे संस्थेने कारवाई करावी, असे निर्देश शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी दिले आहेत.
मोफत पासच्या नावाखाली घेतले पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 4:07 PM
शासनाच्या मोफत एसटी पास योजनेच्या नावाखाली मुलींकडून २० रुपये घेतल्याचे चौकशीत आढळून आल्याने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका व लिपिकावर संस्थेने कारवाई करण्याचे निर्देश माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी दिले आहेत.
ठळक मुद्देअमळनेरात मुख्याध्यापिका व लिपिकावर कारवाईशिक्षणाधिकाऱ्यांचे संस्थाचालकांना आदेशशिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशीत २० रुपये दिल्याचे सांगितले