जळगाव : महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचा:याच्या अलाहाबाद बँकेच्या खात्यावरून परस्पर एकाने पावती भरून दहा रूपये रूपये हजार रूपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आह़े नेमका प्रकार काय आहे, हे लक्षात आल्यानंतरही बँक व्यवस्थापनाकडून सेवानिवृत्त कर्मचा:याचा उडवाउडवीचे उत्तरे मिळत असून पैश्यांसाठी फिरवाफिरव केली जात होती़ संबंधित प्रकार बातमी छापून येवून कारवाई व बदनामीच्या भितीने बँकेकडून तब्बल पाच दिवसानंतर सेवानिवृत्त कर्मचा:याच्या खात्यावर तातडीने रक्कम जमा करण्यात आली़शहरातील श्रीधर नगरजवळील रामनगरमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी दशरथ कृष्णा पाटील हे पत्नी, मुलगा, सून व नातवंडासह राहतात़ ते महापालिकेतून सेवानिवृत्त झाले असून त्यांचे पेन्शनसाठीचे सतरा मजली इमारतीतील अलाहाबाद बँकेत खाते आह़े त्यांचा मुलगा विनोद पाटील हा महापालिकेत सभापती यांचा स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत आह़े वडील नेहमी आजारी असल्याने त्यांना बँकेत पेन्शन काढण्यासाठी येणे शक्य नसल्याने त्यांनी दोन वर्षापूर्वी एटीएम कार्ड काढले असून त्याव्दारे ते व्यवहार करत आहेत़काय घडला होता प्रकारदशरथ पाटील यांच्या खात्यावर दोन वर्षापासून त्यांची पेन्शन जमा झाली की त्यांचा मुलगा विनोद पाटील हेच व्यवहार करत होत़े त्याच्या 20915872055 या खात्यावर 13 हजार रक्कम शिल्लक होती़ गेल्या महिन्यात विनोद पाटील नेहमीप्रमाणे एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांचा व्यवहार पूर्ण झाला नाही व खात्यावर केवळ तीन हजार रूपये शिल्लक असल्याने व्यवहार पूर्ण होत न नसल्याचे समजल़े ख़ात्यावर 13 हजार असताना केवळ तीन हजार रूपये कसे ? यासाठी विनोद पाटील यांनी सतरा मजली इमारतीतील अलाहाबाद बँक गाठली़ पासबुक भरून घेतल़े त्यातही दि़ 19 डिसेंबर 2016 रोजी सेल्फ पेड नावाने दहा हजार रूपये काढल्याची नोंद झाली़ कुणीतरी दुस:यानेच पैसे काढल्याची शंका आल्याने विनोद पाटील यांनी बँक व्यवस्थापकाच्या हा प्रकार लक्षात आणून दिला़पावतीवर नाव नाही, फक्त खातेक्रमांकव्यवस्थापकानेही सुरवातीला विनोद पाटील यांना तुम्हीच पावती भरून पैसे काढले असतील, असे सांगत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला़ मात्र विनोद पाटील यांनी मी व्यवहार केला असल्याचा तुमच्याकडे काय पुरावा असे विचारताच बँकेने पैसे काढल्याबाबतच्या पावतीचा शोधाशोध केली़ बँकेने 19 डिसेंबरला झालेल्या व्यवहाराच्या पावतीचा गठ्ठा काढला असता अजबच प्रकार समोर आला़ पावतीवर कुठल्याही व्यक्तीचे नाव नसून त्यावर केवळ दशरथ पाटील यांचे खाते क्रमांक होता़ खाली दोन ठिकाणी सही न करता संबंधिताने अंगठा लावल्याचे दिसून आल़े कुणीतरी दुस:यानेच खातेक्रमांक टाकून पैसे लांबविल्याचे निष्पन्न झाल्याचे विनोद पाटील यांनी बोलताना सांगितल़ेबातमीच्या धाकाने पैसे खात्यात जमाबँकेकडून दि़ 11 रोजी पैसे खात्यात टाकण्याबाबत आश्वासन मिळाले होत़े त्यानुसार विनोद पाटील यांनी बुधवारी बँक व्यवस्थापकांची भेट घेतली, मात्र एक दोन ते दिवसात पैसे खात्यात जमा होतील असे पोकळ आश्वासन मिळाले होत़े यानंतर विनोद पाटील सदर प्रकार पत्रकारांजवळ कथन केला़ याची कुणकुण बँकेला लागली़ सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास बँकेचा कर्मचारी विनोद पाटील यांना बोलावण्यास आला़ विनोद पाटील बँकेत गेले असता त्यांना त्याच्या खात्यात दहा रूपये रक्कम जमा केल्याची माहिती कर्मचा:यांनी दिली़ ़़़अन् प्रकरणावर टाकला पदडाविनोद पाटील यांना पैसे जमा केल्याबाबत पासबुकमध्ये नोंद बँकेकडून करून देण्यात आली़ डीपॉझीट नावाने दहा हजार रूपये रक्कम जमा झाले असल्याची खात्री झाली़ सर्व कर्मचा:यांकडून पैसे जमवाजमव करून रक्कम खात्यात पैसे टाकले आह़े आता हे प्रकरण येथेच संपवून टाका, असेही कर्मचारी सांगण्यास विसरले नाहीत़ पेन्शनधारकांच्या अज्ञानाचा फायदा घेत यापूर्वीही अनेकदा अलाहाबाद बँकेत असले प्रकार घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आह़े
सेवानिवृत्ताच्या खात्यातून परस्पर काढले पैसे
By admin | Published: January 12, 2017 12:37 AM