शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

मालिकांपेक्षा नाटकातील अभिनयाने अधिक प्रगल्भता - सुकन्या कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 1:14 PM

व. वा. वाचनालयाच्या नूतनीकरण केलेल्या सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी प्रकट मुलाखतीतून व्यक्त केले मत

ठळक मुद्देपालकांनी चढाओढ टाळावीमसाला असला तरच मालिका पाहणार

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३ - मालिकांमध्ये दररोज काम केले तरी अभिनयातील प्रगल्भता ही मालिकांमधून न येता ती नाटकांमधूनच येऊ शकते, असे स्पष्ट मत प्र्रसिद्ध सिने, नाट्य कलावंत सुकन्या कुलकर्णी - मोने यांनी प्रकट मुलाखतीतून व्यक्त केले. व. वा. वाचनालयाच्या नूतनीकरण केलेल्या रामनारायण जगन्नाथ अग्रवाल सभागृहाच्या उद्घाटन समारंभादरम्यान १ मे रोजी अ‍ॅड. सुशील अत्रे यांनी प्रकट मुलाखत घेतली, त्या वेळी त्या बोलत होत्या.व. वा. वाचनालयाच्या रामनारायण जगन्नाथ अग्रवाल या वातानुकुलीत सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन सुकन्या कुलकर्णी- मोने यांच्याहस्ते १ रोजी कोनशीला अनावरण करून झाले. या वेळी व्यासपाठीवर सुकन्या कुलकर्णी यांच्यासह वाचनालयाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, चिटणीस तथा ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, कार्याध्यक्ष अ‍ॅड. प्रताप निकम, उपाध्यक्ष अ‍ॅड. सुशील अत्रे, ज्यांच्या नावाने हे सभागृह आहे ते स्व. रामनारायण अग्रवाल यांच्या पत्नी सुिशला अग्रवाल उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्ज्वालन करण्यात आले.प्रास्ताविक अ‍ॅड. प्रताप निकम यांनी केले. यामध्ये त्यांनी वाचनालयांच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या वेळी सुशीला अग्रवाल, सभागृहाचे अल्पावधीत नुतनीकरण करणारे आर्किटेक्ट ललित राणे, वाचनालयाच्या अभ्यासिकेतून स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या मानसी पाटील या विद्यार्थिनीचे वडील सुरेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.सभागृहामुळे सुविधा उपलब्ध होणारअध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी या नुतणीकरण केलेल्या वातानुकुलीत सभागृहामुळे विविध कार्यक्रम घेण्यासह सुविधा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच कार्याध्यक्ष अ‍ॅड. निकम व आर्किटेक्ट राणे यांच्या कार्याचा गौरव केला.सूत्रसंचालन कोषाध्यक्ष सी.ए. अनिल शहा यांनी केले. या वेळी उपाध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, सहचिटणीस अ‍ॅड. गुरुदत्त व्यवहारे, कार्यकारी मंडळ सदस्य अ‍ॅड. दत्तात्रय भोकरीकर, प्रा. चारुदत्त गोखले, प्रा. शरदचंद्र चाफेकर, संगीता अट्रावलकर, शुभदा कुलकर्णी, अभिजित देशपांडे, प्रा. मनीष जोशी, प्रा. शिल्पा बेंडाळे, प्रभात चौधरी, शैलजा चव्हाण यांच्यासह शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुकन्या कुलकर्णी यांचा दिलखुलास संवादसभागृहाच्या उद््घाटनानंतर अ‍ॅड. सुशील अत्रे यांनी सुकन्या कुलकर्णी - मोने यांची प्रकट मुलाखत घेतली, त्या वेळी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे देऊन मनमोकळा संवाद साधला. या वेळी त्यांनी सध्या माई म्हणून भूमिका करीत असलेल्या मालिकेतील पात्रांविषयी माहिती देऊन या अभिनयाने मी घरा घरात पोहचली असल्याचा उल्लेख केला. अनेक प्रश्नांना त्यांनी दिलेल्या उत्तरांनी उपस्थितांना हसविलेदेखील.शिक्षिका अथवा बँक अधिकारी व्हायचे होतेठरवून अभिनय क्षेत्रात आला की वेगळे कारण होते, या प्रश्नावर सुकन्या कुलकर्णी म्हणाल्या, मला एकतर शिक्षिका अथवा बँक अधिकारी व्हायचे होते. कारण मी ज्या शाळेत शिकले त्या शाळेला सुट्टी जास्त असायची तर काका बँक अधिकारी असल्याने ते कोऱ्या करकरीत नोटा व नवीन नाणी आणायचे, त्यामुळे त्यांचे आकर्षण होते. मात्र शाळेत असताना अचानक अभिनयाची संधी मिळाली व अभिनय क्षेत्रात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मसाला असला तरच मालिका पाहणारदैनंदिन जीवनात जे शक्य नाही तेच मालिकांंमध्ये दिसते असे का, या प्रश्नावर सुकन्या कुलकर्णी यांनी आज काल मसाला आवश्यक असल्याचा उल्लेख केला. आज मालिकांसाठी मसाला उपलब्ध नाही, त्यामुळे असे मसालेदार पात्र साकारले जातात, असे त्यांनी स्पष्ट केले.टीआरपीशी जोडली जातात रिअ‍ॅलिटी शोची गणितरिअ‍ॅलिटी शो व इतर मालिकांमधील वेगळेपण सांगताना सुकन्या कुलकर्णी म्हणाल्या मी व संजय मोने यांनी रिअ‍ॅलिटीमध्ये स्पष्ट मते मांडू शकलो, त्यामुळे खूष असल्याचा उल्लेख केला. मात्र आजच्या रिअ‍ॅलिटी शोचे गणित हे टीआरपीशी जोडलेली असतात, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले. या वेळी त्यांनी सध्या आघाडीच्या एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये बोलविले होते तरी मी गेले नाही, असे सांगून त्यात कोणता अभिनय आहे, असा सवालही उपस्थित केला.पालकांनी चढाओढ टाळावीमुलांच्या नृत्य, गीतांच्या कार्यक्रमांबाबत बोलताना सुकन्या कुलकर्णी म्हणाल्या अशा कार्यक्रमासाठी आज पालकांमध्येच अधिक चढाओढ दिसून येते. यामुळे मुलांमध्ये दबाब येऊन त्यांचे बालपण संपविले जात असल्याचेही त्या म्हणाल्या. या पेक्षा पालकांनी मुलांचे शिक्षण, ते काय वाचतात, काय बघतात व आपण त्यांना किती वेळ देतो, याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले.अध्यात्मापर्यंत पोहचविणारी भूमिका करायचीयापुढे आता कोणती भूमिका करायची इच्छा आहे, यावर त्या म्हणाल्या मला खूप चांगले नाटक करायची इच्छा आहे. ज्या भूमिकेतून खºया अर्थाने अध्यात्मापर्यंत पोहचता येईल, अशी भूमिका साकारायची असून हा आनंद नाटकच देऊ शकेल, असा आवर्जून उल्लेखही त्यांनी केला.अफ्रिका काय मी जळगावला जाऊन आले....सुकन्या कुलकर्णी मे महिना अर्थात भर उन्हाळ््यात जळगावात आल्याने त्यांना खान्देशी उन्हामुळे त्रास झाल्याचा उल्लेख अनेकांनी या वेळी बोलताना केला. त्याला उत्तर देताना सुकन्या कुलकर्णी म्हणाल्या, अफ्रिकेतही जास्त तापमान असते, तेथेही लोक जातातच ना आणि आल्यानंतर सांगतात, मी अफ्रिकेला जाऊन आलो. तसे मीदेखील सांगून आले, मी जळगावला चालले, असे उत्तर सुकन्या कुलकर्णी यांनी दिले व सभागृहात हशा पिकला.

टॅग्स :Jalgaonजळगाव