जळगाव : वाळू निविदा प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला असला तरी जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक वाळू गटांचे लिलाव अद्यापही झालेले नाही. तीन गट शासकीय राखीव असून केवळ १२ गटांचे लिलाव झाले आहे. १६ गटांचे लिलाव अद्याप होणे बाकी आहे.दरवर्षी सप्टेंबर महिन्यात वाळू लिलाव प्रक्रिया होते. मात्र यंदा नागपूर खंडपीठाने वाळू लिलावाबाबत दिलेल्या निर्णयामुळे सुरुवातीला निविदा प्रक्रिया होऊ शकली नव्हती. त्यानंतर पर्यावरण समिती बरखास्त केल्याने पुन्हा ही प्रक्रिया रखडली. अखेर मार्च महिन्यात लिलाव प्रक्रिया सुरू झाली. त्यात तीन गट राखीव ठेवण्यात आले. उर्वरित गटांपैकी केवळ १२ गटांचे लिलाव झाले व १६ गटांचे लिलाव होणे बाकी आहे.शासकीय राखीव गटआव्हाणी, ता. धरणगाव, बाभुळगाव, ता. धरणगाव, जामोद, ता. जळगाव.लिलाव झालेले गटसावखेडा, ता. जळगाव, माहिजी, ता. पाचोरा, कुरंगी, ता. पाचोरा, रुंधाटी, ता. अमळनेर, झुटकार, ता. चोपडा, पथराळे, ता. यावल, बेलव्हाळ -१,ता. भुसावळ, बेलव्हाळ - २, ता. भुसावळ, बेलव्हाळ - ३, ता. भुसावळ, जोगलखेडा, भुसावळ, पिंप्राळा, ता. मुक्ताईनगर, भानखेडा, ता. भुसावळ.लिलावाच्या प्रतीक्षेत असलेले गटथोरगव्हाण, ता. यावल, पिंप्री, ता. यावल, धुरखेडा, ता. रावेर, दोधे, ता. रावेर, वाक, ता. भडगाव, बुधगाव, ता. चोपडा, सावखेडा, ता. अमळनेर, नेहते, ता. रावेर, निंभोरा बु. ता. रावेर, तामसवाडी, ता. पारोळा, नारणे, ता. धरणगाव, वैजनाथ, ता. एरंडोल, नागझिरी, ता. जळगाव, उंदीरखेडे भाग - २, ता. पारोळा, रुंधाटी, भाग - १, ता. अमळनेर, घाडवेल, ता. चोपडा.
निम्म्याहून अधिक वाळू गटांचे लिलाव रखडलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:24 PM