रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.८१ टक्के : मृत्यूदर आला १.७७ टक्क्यांपर्यत खाली
जळगाव : जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित झालेल्या एक लाख १३ हजार ७०४ रुग्णांपैकी १ लाख ७५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ८८.६१ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्यूदर १.७७ टक्क्यांपर्यत खाली आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
दैनंदिन पॉझिटिव्हीटी दरही १० टक्क्यांपर्यत खालीजिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्ण शोध मोहिमेतंर्गत कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्यांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून वेळेवर उपचार होत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. शिवाय मृत्यूदर रोखण्यातही आरोग्य यंत्रणेला यश येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८ लाख ५१ हजार ४७३ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी १ लाख १३ हजार ७०४ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर ७ लाख ३७ हजार ९८७ अहवाल निगेटिव्ह आले आहे. सध्या अवघे ११२ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी दरही १० टक्क्यांपर्यत खाली आला आहे. जिल्ह्यात ६ हजार ३२५ व्यक्ति होम क्वारंटाईन असून ६७० व्यक्ति विलगीकरण कक्षात आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १० हजार ९३० रुग्णांपैकी ७ हजार ५३१ रुग्ण लक्षणे नसलेले तर ३ हजार ३९९ रुग्ण हे लक्षणेध असलेली आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.
तालुकानिहाय कोरोना स्थितीतालुका - उपचार घेत असलेले रुग्ण - बरे झालेले रुग्ण - एकूण मृत्यूजळगाव शहर- २१९८ - २६३५८ - ४७९ जळगाव ग्रामीण-३९१- ३९६२-१०९ भुसावळ-१२३६-८४४४-२७६ अमळनेर-४९५-६९५५-१२८ चोपडा-८७७-११५७७-१४७ पाचोरा- ४४०-३१४६-९८भडगाव-१८८-२९२८-५६धरणगाव-४४७-४१५४-९४यावल- ४७१-३१६९-१०३एरंडोल-६२७-४६३१-७७जामनेर-८५७-६३१९-१०६रावेर-९२०-३५२८-१३२पारोळा-३०६-३७३६-३४ चाळीसगाव-४३२-६३११-१०१मुक्ताईनगर-६३७-३०३०-४९ बोदवड-३०३-१७४३-२७ इतर जिल्ह्यातील -१०५-७६७- -- एकूण - १०९३०-१००७५८-२०१६