शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

एक लाखाहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:16 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित झालेल्या एक लाख १३ हजार ७०४ रुग्णांपैकी १ लाख ७५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ८८.६१ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्यूदर १.७७ टक्क्यांपर्यत खाली आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरही १० टक्क्यांपर्यत खाली

जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्ण शोध मोहिमेतंर्गत कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्यांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून वेळेवर उपचार होत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. शिवाय मृत्यूदर रोखण्यातही आरोग्य यंत्रणेला यश येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८ लाख ५१ हजार ४७३ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी १ लाख १३ हजार ७०४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर ७ लाख ३७ हजार ९८७ अहवाल निगेटिव्ह आले आहे. सध्या अवघे ११२ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी दरही १० टक्क्यांपर्यत खाली आला आहे. जिल्ह्यात ६ हजार ३२५ व्यक्ती होम क्वारंटाईन असून ६७० व्यक्ती विलगीकरण कक्षात आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १० हजार ९३० रुग्णांपैकी ७ हजार ५३१ रुग्ण लक्षणे नसलेले तर ३ हजार ३९९ रुग्ण हे लक्षणे असलेली आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.

तालुकानिहाय कोरोना स्थिती

तालुका - उपचार घेत असलेले रुग्ण - बरे झालेले रुग्ण - एकूण मृत्यू

जळगाव शहर- २१९८ - २६३५८ - ४७९

जळगाव ग्रामीण-३९१- ३९६२-१०९

भुसावळ-१२३६-८४४४-२७६

अमळनेर-४९५-६९५५-१२८

चोपडा-८७७-११५७७-१४७

पाचोरा- ४४०-३१४६-९८

भडगाव-१८८-२९२८-५६

धरणगाव-४४७-४१५४-९४

यावल- ४७१-३१६९-१०३

एरंडोल-६२७-४६३१-७७

जामनेर-८५७-६३१९-१०६

रावेर-९२०-३५२८-१३२

पारोळा-३०६-३७३६-३४ चाळीसगाव-४३२-६३११-१०१

मुक्ताईनगर-६३७-३०३०-४९

बोदवड-३०३-१७४३-२७

इतर जिल्ह्यातील -१०५-७६७- --

एकूण - १०९३०-१००७५८-२०१६