कुंदन पाटील, जळगाव: मार्च महिन्यात राज्यात झालेल्या वादळासह अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी २० कोटींवर मदत उपलब्ध झाली आहे. या मदतीचा सर्वाधिक फायदा धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. ६ हजार ४०२ शेतकऱ्यांना २ कोटी २८ लाखांची मदत मिळणार आहे.
मार्च महिन्यात ८ दिवस वादळासह अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाचे नुकसान झाले होते. खान्देशातील ३५ हजारांवर शेतकऱ्यांच्या ११ हजार ९९१ हेक्टर क्षेत्राला त्याचा फटका बसला होता. तशातच सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने त्यावेळी पंचनाम्यांचे कामही रखडले होते. संप मागे घेताच प्रशासनाने पंचनाम्यांना सुरुवात केली आणि त्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता.त्यानुसार मदत उपलब्ध झाली आहे.
तालुकानिहाय शेतकरी व उपलब्ध मदत
- तालुका- शेतकरी- निधी (लाखात)
- जळगाव- ४३९- ३१.४०१
- भुसावळ- २२०- १६.५४३
- यावल- १३५- ५८.५६२
- रावेर- ५३१- ५८.५६२
- मुक्ताईनगर- १०२५- ७८.६२३
- बोदवड- ६८- ०३.०५५
- पाचोरा- २६६- १०.५००
- भडगाव- १२२४- १५३.५६६
- चाळीसगाव- १४५३- १०४.५७९
- जामनेर- १९४- १६.७७६
- अमळनेर- १२७८- १०९.१९९
- एरंडोल- १९३७- १५३.०९०
- धरणगाव- ६४०२- १०१३.३३२
- चोपडा- २४७४- २२८.३०२
- पारोळा- ७१७- ४७.८५२
- एकूण- १८३६३- २०४२.६१