जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्यात सफाईचे काम करणाऱ्या श्याम राजू चव्हाण या तरुणाच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी एमआयडीसी पोलीस व स्पेक्ट्रम कंपनीचे संचालक दीपक चौधरी यांनी रविवारी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. या मदतीामुळे दोन्ही डोळ्यांनी प्रज्ञाचक्षू असलेल्या श्यामच्या जीवनात प्रकाश उजेडणार आहे.श्याम हा गेल्या २१ वर्षापासून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सफाईचे काम करीत आहे. प्रत्येक अधिकाºयाचे दालन, पोलीस स्टेशन याची नित्याची सफाई, पाण्याचे जार, चहा आणून देणे हे नित्याचे तो काम करतो. जन्मत: प्रज्ञाचक्षू असतानाही तो परिस्थितीशी संघर्ष करीत आहे. त्याची जगण्याची व मुलांना शिकविण्याची जिद्द पाहता पोलीस त्याला आपआपल्या परीने मदत करतात. त्यावर त्याचा घर संसार चालतो.पूर्वी हॉटेलमध्ये होता वेटर... श्याम हा पूर्वी एका हॉटेलमध्ये वेटर होता. सहायक फौजदार रामकृष्ण पाटील १९९३ मध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशनला कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असताना त्यांनी श्याम याला पोलीस ठाण्यात कामासाठी आणले होते. तेव्हा पाटील स्वत:च्या खिशातून श्याम याला दरमहा १५० रुपये महिना द्यायचे. १९९४ पासून श्याम आजतायगत कामाला कायम आहे.हैदराबादला होणार शस्त्रक्रियाश्याम याला जीवनात कायमचा प्रकाश यावा यासाठी पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ, स्पेक्ट्रम कंपनीचे संचालक दीपक चौधरी, उपनिरीक्षक योगेश शिंदे, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील व रामकृष्ण पाटील यांनी ५० हजार रुपये रविवारी श्यामला सुपूर्द केले. हैदराबाद येथील एल. बी. प्रसाद रुग्णालयात ही शस्त्रक्रिया होणार आहे.
प्रज्ञाचक्षू श्यामच्या जीवनात येणार प्रकाशाची पहाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:27 PM