आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१४ : मॉर्निंग वाकसाठी गेलेले देविदास नारायण बारी (अस्वार) वय ६२ रा.शिरसोली प्र.बो.यांना जळगावकडून पाचोºयाकडे जाणाºया भरधाव वाहनाने उडविल्याने ते ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजता शिरसोली गावाजवळ घडली. या अपघातानंतर धडक देणाºया वाहनधारकाने थांबून मदत करण्याचेही सौजन्य दाखविले नाही.देविदास बारी हे दररोज पहाटे पत्नी अनुसयाबाई यांना सोबत घेऊन जळगाव रस्त्याने फिरायला जातात. मंगळवारी ते एकटेच गेले होते. शिरसोली गाव सोडल्यानंतर काही अंतरावर जळगावकडून येणाºया भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.त्याचवेळी जळगाव येथे बाजारात फुले घेऊन जाणारा त्यांना नातेवाईक राहूल तुकाराम बारी यांना ते रस्त्यावर रक्ताच्या थारोळयात आढळून आले. त्याने लागलीच त्यांचा मुलगा विजय यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून संजय बारी यांच्या वाहनातून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. सहायक फौजदार भालचंद्र पाटील तपास करीत आहेत.वायरमन म्हणून ओळखदेविदास बारी यांची वायरमन म्हणून ओळख होती. इलेक्ट्रीक पंप वायंडीग तसेच शेती पंपाच्या दुरुस्तीचे काम ते करत होते. त्यांचे शिरसोली प्र.बो.येथे दुकान आहे. आता मुलगा विजय हे काम सांभाळतात. लहान मुलगा संभाजी बारी विद्यालयात लिपिक तर संभाजी यांची पत्नी मनिषा या शिक्षिका आहेत. भाऊ रामदास बारी हे बारी समाज विद्यालयाचे माजी अध्यक्ष तर अखिल भारतीय बारी समाजाचेही अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृध्दाला शिरसोली येथे भरधाव वाहनाने उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 4:19 PM
मॉर्निंग वाकसाठी गेलेले देविदास नारायण बारी (अस्वार) वय ६२ रा.शिरसोली प्र.बो.यांना जळगावकडून पाचोºयाकडे जाणाºया भरधाव वाहनाने उडविल्याने ते ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजता शिरसोली गावाजवळ घडली. या अपघातानंतर धडक देणाºया वाहनधारकाने थांबून मदत करण्याचेही सौजन्य दाखविले नाही.
ठळक मुद्दे धडक देणारे वाहन थांबलेच नाहीअपघाताची मालिका सुरुचसलग तिस-या दिवशी अपघाताचा बळी