जळगाव : जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून कोरोनामुळे एकही मृत्यू नसल्याने मृत्युदर एका अंशाने कमी झाला असून, नवे रुग्ण कमी, बरे होणारे अधिक असे चित्र असल्याने रिकव्हरी रेट वाढला आहे. मृत्युदर २.३७ टक्के, तर रिकव्हरी रेट ९६.८४ टक्के झाला आहे.
रविवारी शहरातील १७ रुग्णांसह २८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरटीपीसीआरचे ७४२ अहवाल आले, त्यात १८ जण बाधित आढळून आले आहेत, तर २८५ ॲन्टिजेन चाचण्या झाल्या त्यात दहा बाधित आढळून आले आहेत. ३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. जानेवारीच्या सुरुवातीपासूनच कोरोनामुळे एकाही बाधिताच्या मृत्यूची नोंद नसल्याने नववर्षाची सुरुवात दिलासादायक झाली आहे. त्यामुळे मृत्युदर एका अंशाने का होईना घटला आहे.
या भागात रुग्ण
शहरातील खोटेनगर, शिवकॉलनी, रायसोनीनगर, भगीरथ कॉलनी, बळीराम पेठ या भागात रुग्ण आढळून आले आहेत.