शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

भुसावळ शहर व तालुक्यात तपासणी व सर्वे योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे मृत्यूदर जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 6:49 PM

भुसावळ शहर व तालुक्यात कोरोनाने गेल्या दोन महिन्यापासून कहर केला आहे.

ठळक मुद्देसमितीने केली नाराजी व्यक्त अधिकाऱ्यांना दिल्या विशेष सूचना

भुसावळ : शहर व तालुक्यात कोरोनाने गेल्या दोन महिन्यापासून कहर केला आहे. त्यात मृत्यू दरही जास्त प्रमाणात आहे. तपासणी व सर्व योग्य पद्धतीने होत नसल्यामुळेच मृत्यूदर जास्त असल्याचे मत केंद्रीय समितीने व्यक्त करून नाराजी व्यक्त केली आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी तपासणी व सर्वे योग्यप्रकारे करण्यात यावा, अशा सूचना प्रांताधिकारी रामसिंग सुलाने व आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहे.जिल्ह्यात दोन दिवसांपासून कुटुंब कल्याण विभागाचे वरिष्ठ प्रादेशिक संचालक डॉ.अरविंद अलोने व सार्वजनिक आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ.एस.डी.खापर्डे यांचे केंद्रीय पथक दाखल झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी कसा करता येईल, यासाठी २० रोजी पथकाने जळगाव शहराची पाहणी केली. २१ रोजी केंद्रीय पथक भुसावळ शहरात होते. पथकाने जवाहर नदयोय विद्यलयातील कोविड सेंटर, भोई नगरातील कंटेनमेंट झोनची पाहणी केली व रेल्वे हॉस्पिटल कोविड सेंटरला भेट दिली.रुग्णांना काय काय सुविधा देण्यात येतात?जवाहर नवोदय विद्यालय व रेल्वे दवाखान्यातील कोविंड सेंटर येथे पथकाने पाहणी केली व चौकशी केली. रुग्णांना काय काय सुविधा देण्यात येतात, कोविड सेंटरची क्षमता किती रुग्णांची आहे, ७५० रुग्ण असल्यानंतरही, अजून वाढवा. यापुढे मृत्यूदर वाढणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना देऊन डॉक्टरांशी चर्चा केली. सर्वे योग्य पद्धतीने करून पॉझिटिव्ह रुग्णांना शोधून काढा. त्यांच्यावर उपचार करा. त्यानंतरच मृत्यूदर कमी होऊ शकतो, अशा सूचना समितीने दिल्या.यावेळी पथकासोबत जात पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, उपजिल्हाधिकारी तथा पालिकेचे प्रभारी सीईओ किरण सावंत, डीवायएसपी गजानन राठोड, तहसीलदार दीपक धिवरे, गटविकास अधिकारी विलास भटकर, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब ठोंबे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता पांढरे , डॉ.कीर्ती फलटणकर आदी उपस्थित होते.पथकाने घेतली प्रांत कार्यालयात बैठककेंद्रीय पथकाने प्रांत कार्यालयात डॉक्टर व अधिकाºयांची बैठक घेतली. यात शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आढावा घेण्यात आला. तसेच दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहून अधिकारी व कर्मचाºयांना विशेष सूचना दिल्याचे सांगण्यात आले.प्रसार माध्यमांना ठेवले अलिप्तकोरोनाचा कहर रोखण्यात प्रशासन कमी पडत आहे. यामुळे केंद्रीय पथकाने कानउघडणी केली. हा प्रकार उघडकीस येऊ नये व आपले पितळ उघडे पडणार या भीतीपोटी प्रसार माध्यमांना अलिप्त ठेवण्यात आले, तर केंद्रीय पथकाने पत्रकारांना माहिती देण्यात टाळाटाळ केली व पथक जळगाव रवाना झाले.पथकाने कोविंड सेंटरची केली बाहेरूनच पाहणीकेंद्रीय पथकाने रेल्वे दवाखान्यांमध्ये कोविड सेंटरची पाहणी केल्याची माहिती अधिकारी देत आहे, तर पथकातील अधिकाºयांनी सेंटरमध्ये पाहणीच केली नसल्याची माहिती एका रुग्णाने दिली आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाने केवळ दौºयाचा फार्स केल्याचे दिसून येत आहे. कोविड सेंटरमध्ये न जाताच पथकाला समस्या काय दिसणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या रुग्णालयात सुविधा चांगली मिळत असल्याचेही त्या रुग्णाने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ