लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : कोरोनाचा प्रार्दूभाव वाढल्यापासून बाधित व संशयितांचा मृतांचा आकडा अचानक वाढल्याने अनेक शंका उपस्थित केल्या जात असतानाच कोरोना नसता तरी मृत्यू दर हा एवढाच असता, असा निष्कर्ष डेथ आॅडिट कमिटीने संशयितांच्या मृत्यूच्या बाबतीत काढला आहे़ सारी नव्हे मात्र, न्यूमोनिया व को- मॉरबॅडिटी (अन्य व्याधी) ही कारणे संशयितांच्या मृत्यू मागे असल्याचे समितीने नोंदविले असल्याचे सूत्रांनी सांगितले़ बाधितांनाही अन्य व्याधी असल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष आहे़कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर कोरोना रुग्णालयात संशयित मृतांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र समोर येत होते़ हे मृत्यू सारीने होत असल्याचाही प्राथमिक निष्कर्ष समोर आला होता़ त्यात बाधितांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढल्याने या सर्व मृत्यूचे आॅडीट करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने एक समिती गठीत केली़ या समितीनेच जळगावात होणाऱ्या मृत्यूबाबत हा निष्कर्ष काढला आहे.सारी हा एक श्वसनरोगाचा गंभीर प्रकार असल्याचे समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत ३५वर संशयितांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे़ यासह १२ बाधितांचा मृत्यू या सर्वांचे डेथ आॅडीट या समितीने केले आहे़मृत्यू झालेल्या सर्व संशयित व बाधितांची माहिती त्यांचे आधिचे व नंतरचे सर्व अहवाल, दाखल करतावेळी त्यांच्या प्रकृतीची माहिती आदीसह विविध बाबींच्या अभ्यासाअंती या समितीने काही निष्कर्ष काढले आहेत. बाधितांच्या मृत्यूसंदर्भातील कारणे ही आरोग्य संचालकांकडे पाठविण्यात आलेली आहे़समितीत समावेशसमितीमध्ये अध्यक्ष म्हणून औषध वैद्यक शास्त्रविभागाचे प्रमुख डॉ़ भाऊराव नाखले, वैद्यकीय अधीक्षक डॉ़ किरण पाटील, न्याय वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ़ वैभव सोनार, बधिरीकरण शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ़ संदीप पाटील, विकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ़ भारत घोडके, सुक्ष्मजीव शास्त्र विभागाचे डॉ़ किशोर इंगोले यांचा समावेश आहे़बाधितांच्या मृत्यूचे निष्कर्षबारा बाधितांच्या मृत्यू बाबतची ही माहिती आहे़ त्यात विविध कारणांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे, काही मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयात आल्याचे अशी कारणे नमूद आहेत़ संशयित मृतांसंदर्भातील माहिती अद्याप पूर्ण नाही-डॉ़ भास्कर खैरे, अधिष्ठाता
कोरोना नसता तरीही मृत्यूदर असता सारखाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 12:47 PM