शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
5
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
6
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
7
५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
8
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
9
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
10
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
11
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
12
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
13
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
14
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
15
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
17
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
18
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
19
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!

गहाणवटीचा ऐवज- डोके (५)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:46 AM

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘हसु भाषिते’ या सदरात साहित्यिक प्रा.अनिल सोनार यांचा विशेष लेख गहाणवटीचा ऐवज- डोके.

हिंदी चित्रपटसृष्टीला उर्फ बॉलीवूडला बंगाली, मराठी इत्यादी चित्रपटसृष्टीहून कमअस्सल का मानली जाते, काही कळत नाही. वास्तविक एका सुसंकृत, सज्जन माणसात जे जे गुण असतात, ते सर्व या सृष्टीतल्या लोकांमध्ये असतातच. नुसते असतात असे नाही तर अगदी खच्चून भरलेले असतात. उदाहरणार्थ देवभोळेपणा, ईश्वरावरच असीम श्रद्धा.सिनेमावाल्यांचा कामाचा भारदेवदेवतांवरच असतो,मोलकरणी ‘सीता’ बाय,तर नोकर ‘रामू’ काका असतोयामुळे होते काय की ओठांना सतत देवदेवतांचे स्मरण राहाते. आता प्रामाणिकपणा या गुणाबद्दल बघू. प्रामाणिकपणात नट्या आघाडीवर असतात. त्यांच्या सौंदर्याचं रहस्य कशात आहे हे त्या कधीच दडवून ठेवत नाहीत. त्यावरून कळतं की-अभिनेत्रींच्या सौंदर्याचं जन्म रहस्य विविध साबणांमध्ये असतं,म्हणून तर साबणांच्या जागी त्यांच्या आईवडिलांचं नाव नसतंअर्थात हा त्यांचा प्रामाणिकपणाही गोंधळात टाकणारा असतो. सिनेसृष्टी म्हणजे जाहिरातींवर उभी असलेली इमारत. तिथे-जाहिरातींच्या कसबावरबैलसुध्दा राहातो गाभणसौंदर्य रहस्य म्हणून सांगतेप्रत्येक नटी वेगळाच साबण.यामुळे गडबड अशी होते की, सौंदर्योत्सुक तरुणी ते सगळेच साबण खरेदी करून आणतात आणि वापरतातही. पण होते असे की, प्रत्येक साबण बहुदा असा विचार करतो की, ‘तो साबण तिला सुंदर करेलच, मग मी कशाला.’ या भानगडीत त्या तरुणींचे सुंदर व्हायचे राहूनच जाते.खरं बोलणं, सत्यवादी असणं, हा एरवीही तसा दुर्मिळच गुण, पण या सृष्टीत तो सढळपणे आढळतो. एक अभिनेत्री समोरून येताना दिसताच मी माझ्या सिनेपत्रकार मित्राला म्हणालो, ‘ती बघ सत्यवादी नसणारी खोटारडी अभिनेत्री’ त्यावर हसून माझा मित्र म्हणाला, ‘ती पूर्णपणे खोटं बोलणारी नाहीये.ऐक-ती अभिनेत्री खरंसुद्धाबोलून जाते अधून-मधून,मी विचारलं, ‘विवाहित’?ती म्हणाली, ‘अधून-मधून’ती तरी काय करणार बिचारी. माझ्या या अति उत्साही पत्रकार मित्रासारखे नट्यांच्या संदर्भात कायम उत्सुक असणारे पत्रकार काय विचारतील आणि काय लिहितील, सांगता येत नाही. माझा हा पत्रकार मित्रच घ्या-नटीबद्दल उत्साह दाखवणार नाहीमग तो पत्रकार कसला,तिच्या लग्नाच्या बातमीबरोबरचपुत्रप्राप्तीबद्दलही लिहून बसलाजिद्द हाही मोठा गुण इथल्या मंडळींमध्ये असतो. एकेकाळी प्रदीपकुमार, भारतभूषण इत्यादी ठोकळेबाज मख्य चेहऱ्यांनीही एका मागोमाग एक चित्रपट गाजवले होते. इकडे महंमद रफी गायचा, तिकडे भारत भूषणचा ‘बैजू’ हीट व्हायचा. जमाना बदलला तरी आपल्या चेहºयाला अभिनयाचा स्पर्शही होऊ न देणारे हिरो आजही आहेत. फरक आहे तो या नव्यांच्या जिद्दीत. त्यांच्या अभिनयाला उंची गाठून देण्याच्या क्तृप्त्यात कसे ते बघावं.नटाने आपल्या अभिनयालाशेवटी उंचावर नेलेच.डोंगरावर युनिट नेऊनशिखरावर शुटींग केले.निर्जिव अभिनय म्हणणाºयांनात्याने चोख उत्तर दिले.निर्जिव चेहरा तसाच ठेवूनमरण दृष्य ‘जिवंत’ केले.-प्रा.अनिल सोनार