जळगाव : जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत बुधवारी नव्याने २०७ कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ५ हजार १०वर पोहोचली आहे. बुधवारी सापडलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये अमळनेर ३९, रावेर ३०, धरणगाव २३ तर जळगाव शहरात २२ रुग्ण सापडले. शिवाजीनगरमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच असून बुधवारीही सहा रुग्ण सापडल्याने येथील रुग्णांची संख्या आता ६३वर पोहोचली आहे.बुधवारी दिवसभरात ८ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले.आठही मृत्यू ५० वर्षे वयापेक्षा जास्त व्यक्तींचेजिल्ह्यात बुधवारी मृत्यू पावलेल्या सर्व कोरोनाबाधितांचे वय हे ५० वर्षाच्या वरील होते. त्यातील तीनजण हे ७० वर्षे व त्यावरील होते.याठिकाणी आढळले बाधितअमळनेर ३९, रावेर ३०, धरणगाव २३, जळगाव शहर २२, चोपडा व एरंडोल प्रत्येकी १८, मुक्ताईनगर १६, पाचोरा १०, भुसावळ ०८, जळगाव ग्रामीण ०७, बोदवड ०६, यावल ३, चाळीसगाव ०३, भडगाव, जामनेर, पारोळा व पर जिल्ह्यातील ०१ रूग्णांचा समावेश आहे़
शिवाजी नगर भागात सर्वात जास्त बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 12:38 PM