शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

सर्वाधिक विद्यार्थी गळती चाळीसगावात

By admin | Published: February 14, 2017 12:43 AM

जिल्हा परिषदेच्या शाळा : .. तर होणार मुख्याध्यापक, शिक्षकांची वेतन कपात

गोंडगाव, ता.भडगाव :  जि.प.   शाळांमध्ये विद्यार्थी गळतीचे प्रमाण वाढत आहे. यंदा 8 हजार विद्यार्थी स्थलांतरित झाले असून सर्वाधिक प्रमाण चाळीसगाव तालुक्यात आहे, शाळा पटावर विद्याथ्र्याचे नाव असते, मात्र प्रत्यक्षात विद्यार्थी शाळेत दिसत नाही. त्यावर उपाय म्हणून  100 टक्के उपस्थिती असलेल्या विद्याथ्र्याना प्रमाणपत्र द्यायचे व त्याचवेळी पाच टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी अनुपस्थित असतील तर त्या वर्गशिक्षकाच्या वेतनात कपात करायची, असा प्रस्ताव शासनाला सादर करण्याच्या हालचाली जि.प. प्रशासनाने सुरू केल्या आहेत.शाळेत विद्यार्थी संख्या दाखवण्यासाठी हजर नसलेले विद्यार्थी पटावर दाखवले जातात. प्रत्यक्षात मुले शाळेत येतच नाही. दिवसागणिक ही समस्या गंभीर होत असून जि.प. शाळा एकत्रीकरणाचे प्रस्ताव शिक्षण समिती बैठकीत ठेवले जात आहे. अनु्पस्थित विद्याथ्र्याची गळती रोखण्यासाठी जि.प. प्रशासनाने वर्गशिक्षकाचे वेतन कपातीचा प्रस्ताव तयार केला आहे.जि.प. शाळांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. वर्गात मुले नाहीत म्हणजे शिक्षकावरील कामाचा भार कमी, पर्यायी शाळेतील काम कमी, त्यामुळे पुढील यंत्रणेतील केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी अशा सगळ्यांचाच कामाचा भार कमी असा कयास प्रशासनाने लावला आहे, तर दुसरीकडे शाळेत विद्यार्थी गळती असताना 250 पेक्षा अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत,दर तीन महिन्यात आढावा घेणारविद्यार्थी उपस्थितीचा दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन 100 टक्के उपस्थिती असलेल्या विद्याथ्र्याना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या वर्गाची उपस्थिती 100 टक्के आहे त्या वर्गशिक्षकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 100 टक्के उपस्थिती असलेल्या शाळा मुख्याध्यापकांनाही प्रमाणपत्र दिले जाणार आहे.शिक्षकांबरोबर अधिकारिवर्गाला फटकाविद्याथ्र्याची अनुपस्थिती जास्त असणा:या वर्गातील शिक्षकांपासून गटशिक्षणाधिका:यांर्पयत सर्वाच्या पगारात कपातीचा उपाय प्रशासनाने शोधून काढला आहे.  याबाबत सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी शिक्षण विभागाकडे पत्रकदेखील जारी केले आहे. हा प्रस्ताव शासनाला पाठवण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. संबंधित पत्र गटशिक्षणाधिका:यांना जिल्हा परिषदेकडून पाठविण्यात आले आहे.असे असेल वेतन कपातीचे प्रमाणज्या वर्गात पाच टक्केपेक्षा अधिक मुले अनुपस्थित असतील त्या वर्गातील  शिक्षकांच्या वेतनात कपात केली जाईल. शाळेच्या एकूण पटसंख्येच्या प्रमाणात पाच टक्केपेक्षा अधिक विद्यार्थी अनुपस्थित असतील तर मुख्याध्यापकांच्या वेतनात कपात केली जाईल. पाच टक्केपेक्षा अधिक विद्यार्थी अनुपस्थित असलेल्या केंद्रातील शाळांच्या संख्येनुसार  केंद्रप्रमुखांच्या वेतनात कपात करण्यात येईल. अशाच प्रकारे केंद्र संख्येनुसार शिक्षण  विस्तार अधिकारी आणि बीटच्या संख्येनुसार  शिक्षणाधिका:यांच्या वेतनात कपात करण्याचा प्रस्ताव आहे.शिक्षकांसह अधिका:यांचे मत मागवलेया विद्याथ्र्याच्या अनुपस्थितीबाबत  उपाय म्हणून काय करता येईल किंवा हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याबाबत शिक्षकासह अधिकारिवर्गाचे मत मागवले आहे.गळतीचे प्रमाण आणि समायोजनगळतीचे प्रमाण एकीकडे वाढत आहे आणि अतिरिक्त शिक्षकांची संख्याही वाढत आहे. शासनाला ही जबर डोकेदुखी ठरत आहे. अतिरिक्त शिक्षकाला सामावून घेताना मोठय़ा अडचणी समोर येत आहे. अतिरिक्ति शिक्षकांची संख्या जास्त असल्याने 2012 मध्ये भरती बंद असतानाही काहींना वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव दिले आहेत. त्यांची आता चौकशी लागली आहे. काही शाळांमध्ये कॅटलॉगला मुलाचे नाव असते, मात्र तो प्रत्यक्षात शाळेत येत नाही. मुळात तो त्या गावातच राहात नाही, असेही प्रशासनाच्या लक्षात आले आहे.                                             (वार्ताहर)पटसंख्या कमी होण्याची कारणे4जि.प. शिक्षकांचे पाल्य इंग्लिश मीडियम शाळेत.4शैक्षणिक दर्जाचा अभाव.4संगणक शोभेची वस्तू.4शिक्षकांना अशैक्षणिक कामात गुंतवणे.4ग्रामशिक्षण समित्या नावालाच.4इंग्रजी शिक्षण नसल्यासारखे.4अधिकारिवर्गाचे दुर्लक्ष.4शाळा इमारती पडक्या असल्याने पालकांची नाराजी.4शिक्षक मोबाइलवर, विद्यार्थी वा:यावर.जिल्ह्यातील गळतीचे प्रमाण तालुका       शाळा संख्या   गळतीचे प्रमाणचाळीसगाव            190          3830भडगाव                 95            658पाचोरा                158           453अमळनेर              135           366भुसावळ                68             53बोदवड                 53             72चोपडा                 138           804धरणगाव              93            245एरंडोल                 65            420जळगाव              107           525जामनेर               208            419मुक्ताईनगर          109           266पारोळा               118           449रावेर                  151           340यावल                140           110