चंद्रशेखर जोशी / ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 13 - व्यक्तीची जडणघडण ही बालपणापासून होते. बालपणी मिळालेले बाळकडू हे आयुष्यासाठी मोठी शिदोरी असते. त्यात आईचा वाटा मोठा असतो. माझी आई रूपाराणी शर्मा यांनी तर आम्हाला घडविण्यासाठी खूपच प्रय} केले, असे प्रांताधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले. मातृदिनानिमित्त आईबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, आई शासकीय सेवेत आर्किटेक्ट आहे. हरियाणा राज्यात चंदिगड येथे ती असते. बालपणी शिक्षण घेत असताना. नोकरी करत असतानाही आमच्याकडे तीचे बारकाईने लक्ष असायचे. आमचा अभ्यास, अन्य वाचन याकडे तिचे कटाक्षाने लक्ष असायचे. नोकरी सांभाळून ती हे काम कौशल्याने करत असे. तीचा संस्कार व आमच्याकडे असलेले लक्ष यामुळेच आज या पदार्पयत पोहोचू शकलो. आपण भारतीय प्रशासन सेवेत (भाप्रसे) जाण्यासाठी उत्सुक होतो. त्यासाठी आई जवळ इच्छा व्यक्त केली असता तीनेही प्रोत्साहन दिले. तिचा अभ्यास हा आर्किटेक्टच्या दृष्टीने होता. मात्र भारतीय प्रशासन सेवेकडे वळण्यासाठी मला काय करावे लागेल, अभ्यास कसा असावा याबाबत तीने मला मार्गदर्शन केले. आयुष्याच्या वाटचालीत आईचा वाटा मोलाचा आह़े
आईने दिशा दिली
By admin | Published: May 14, 2017 12:13 PM