शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

आईने जागविला आत्मविश्वास

By admin | Published: May 14, 2017 12:38 PM

आईने मला उमेद दिली. चांगला अभ्यास कर.. अभ्यासिकेत अधिक वेळ दे.., यश नक्की मिळेल.., असे तिने मायेने सांगत आत्मविश्वास जागविला..

चंद्रकांत जाधव / ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 14 - कृषी विषयातील पदवीमध्ये सवरेत्तम विद्यार्थी असताना मी तीनदा बँकांच्या परीक्षेत नापास झालो. निराशा आली. अशा स्थितीत मी राहुरी कृषी विद्यापीठातून घरी निघून गेलो.., आईने मला उमेद दिली. चांगला अभ्यास कर.. अभ्यासिकेत अधिक वेळ दे.., यश नक्की मिळेल.., असे तिने मायेने सांगत आत्मविश्वास जागविला.. तिच्या मार्गदर्शनानुसार अधिक मेहनत घेतली आणि बँकेत कृषी अधिकारी झालो. नंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही यश मिळाले. आज मी अतिरिक्त सीईओ पदार्पयत आईमुळेच पोहोचलो, असे गौरवोद्गार जि.प.चे अतिरिक्त सीईओ संजय मस्कर यांनी काढले.  मातृदिनानिमित्त आईबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना  ते म्हणाले की,  वडील साहेबराव मस्कर हे मूळचे आंबेदरे ता.सातारा येथील आहे. ते रयत  शिक्षण संस्थेत शिक्षक होते. तर आई विमल मस्कर या जुनी 7 वी पास आहे. आई या घर व कुटुंब सांभाळायच्या. मस्कर यांना कल्पना घाडगे, सुरेखा पाटील व प्रतिभा बाबर पाटील या बहिणी आहेत. या तीन्ही बहिणीदेखील पदवीधर झाल्या. मस्कर यांचे प्राथमिक  शिक्षण पुणे जिल्ह्यातील रांजणी ता.आंबेगाव येथे  झाले. तर माध्यमिक शिक्षण राहाता (नगर) येथे रयत  शिक्षण संस्थेच्या विद्यालयात झाले. याच विद्यालयात त्यांचे वडील साहेबराव मस्कर हे मुख्याध्यापक होते. पुढे कृषी विषयातील पदवी पुणे कृषी महाविद्यालयात घेतली. नंतर पदव्युत्तर पदवीसाठी राहुरी कृषी विद्यापीठात संजय मस्कर हे प्रवेशित झाले. वडील मुख्याध्यापक  किंवा शिक्षक होते, पण घरचा अभ्यास आई विमल मस्कर याच घ्यायच्या.  स्वत:ची कामे, घर झाडणे ही कामे आई करायला लावायची. तीने स्वावलंबी व्हायला  शिकविले.संजय मस्कर हे 10 वीत असताना अभ्यास सोडून खेळताना वर्ग शिक्षक यांना दिसले. दुस:या दिवशी वर्ग शिक्षकाने घरून चिठ्ठी आण. त्या शिवाय वर्गात बसू देणार नाही, असे सांगितले. घरी आई वडीलांनी चिठ्ठी दिली नाही. चार दिवस वर्गात प्रवेश दिला नाही. याच विद्यालयात वडील साहेबराव हे मुख्याध्यापक होते. पण शिक्षेपासून बचाव झाला नाही. 10 वीचे वर्ष वाया घालवू नये म्हणून आई रागावली. नंतर वडीलांनी मस्कर यांच्याकडून माफिनामा लिहून घेतला. त्यावर शिफारस केली नंतर वर्गात प्रवेश मिळाला. 1984ला अलाहाबाद बँकेत कृषी अधिकारी म्हणून नोकरी लागली. नंतर 1986मध्ये गटविकास अधिकारी म्हणून निवड झाली. या  सर्व  यशात जेवढा वडीलांचा वाटा आहे, तेवढा  वाटा आर्इ विमल यांचा आहे, असे संजय मस्कर  म्हणाले.