जळगाव : रावेर तालुक्यातील बलवाडी येथे आपल्या दहा महिन्याच्या तान्हुल्याचे जाऊळ देऊन जळगावातील रामेश्वर कॉलनीतील घरी परत येत असताना राष्टÑीय महामार्गावर मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पूनम प्रशांत जैन (वय २४ रा.बलवाडी, ता.रावेर ह.मु.रामेश्वर कॉलनी, जळगाव) ही विवाहिता चिरडल्या गेल्याने जागीच ठार झाली तर पती प्रशांत सतीश जैन व त्यांचा दहा महिन्याचा मुलगा श्रेयस हे बालंबाल बचावले आहे. राष्टÑीय महामार्गावर गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाजवळ शनिवारी दुपारी पावणे दोन वाजता हा अपघात झाला.जैन इरिगेशनमध्ये नोकरीलायाबाबत सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, प्रशांत सतीश जैन हे पत्नी पूनम (वय २४) हे मुलगा श्रेयस याचे जाऊळ असल्याने त्याला घेऊन दोन दिवस आधी मुळ गाव बलवाडी, ता.रावेर येथे गेले होते. जैन हे बांभोरी येथील जैन इरिगेशन कंपनीत कामाला आहेत.पूनम जैन यांचे सासर बलवाडी व माहेर जळगाव आहे. वडील राजू सैतवाल हे पोलन पेठेतील जैन ब्रदर्स येथे वाहनावर चालक म्हणून नोकरीला आहेत. रामेश्वर कॉलनीत ते परिवारासह राहतात. वरच्या मजल्यावर मुलगी पूनम व जावई हे दोघं मुलासह राहत होते. प्रशांत हे ड्युटीला गेल्यावर पूनम आईजवळच राहत होती. भाऊ हर्षल हा आठवी तर बहीण शुभांगी ही बारावीला आहे. हे सर्व जण एकाच ठिकाणी राहत होते. दोन वर्षापूर्वी पूनम व प्रशांतचे लग्न झाले होते. गावाकडे रोजगार नसल्याने प्रशांत हे जैन इरिगेशन या कंपनीत कामाला लागले होते. दोघांचा संसार अगदी आनंदात सुरु होता. त्यांच्या या संसारात श्रेयस रुपी वेल फुलली होती, त्यामुळे हा संसार अधिकच बहरला होता, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. त्यांच्याया संसाराला दृष्ट लागली. या अपघातात महिला ठार झाल्याचे लक्षात येताच चालक ट्रक घटनास्थळावरुन सोडून फरार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक राहुल वाघ, वासुदेव मराठे, युनूस शेख, चंद्रकांत पाटील, चेतन पाटील, राजेंद्र साळुंखे व गुलाब माळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत महिलेला जिल्हा रुग्णालयात हलविले. क्रॉसबारला धडक करंज येथील तरुण ठारशेतातील टोमॅटो मालवाहू रिक्षातून कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत असताना रिक्षाच्या टपावर बसलेला महेंद्र निंबा धनगर (वय २० रा.करंज, ता.जळगाव) हा तरुण शेतकरी शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या क्रॉसबारला धडक बसल्याने ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. साईडपट्टीच्या दिशेने फेकले गेल्याने पिता-पूत्र बचावलेशुक्रवारी जाऊळचा कार्यक्रम आटोपला. शनिवारी जैन यांची दुपारची ड्युटी असल्याने ते दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.एन.१४७६) जळगावला येण्यासाठी निघाले. साकेगाव सोडल्यानंतर गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाजळ मागून भरधाव वेगाने येणाºया ट्रकने (क्र.एम.एच.४३ वाय ७७४०) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात पूनम या महामार्गाच्या दिशेने फेकल्या जाऊन ट्रकखाली सापडल्या. त्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या. तर मुलगा श्रेयस व पती प्रशांत हे साईडपट्टीच्या दिशेने फेकले गेले, त्यामुळे दोघं बाप-लेकांना खरचटलेही नाही. दैव बलवत्तर म्हणून दोघं सुखरुप राहिले.
मुलाचे जाऊळ देऊन परतणाºया आईला ट्रकने चिरडले
By admin | Published: March 19, 2017 12:57 AM