शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

‘मदर्स डे’ आणि ‘मातृदिन’

By admin | Published: May 24, 2017 1:36 PM

ख:या आयुष्यात मुलं आपल्या आईला काहीही बोलून न दाखवता जपत असतात.

 गेल्या रविवारी दिवसभर फेसबुक आणि व्हॉटस् अॅप वरती ‘‘आई’’ या विषयावरच्या पोस्टस्चा धबधबा कोसळत होता. कुठल्या कुठल्या जुन्या कविता, छान छान सुभाषित, घरोघरीचे  जुने- पाने फोटो यांची नुसती रेलचेल झाली होती. अर्थातच दुस:या हाताला म्हाता:या आईची दु:ख, वृद्धाश्रम, मुलांचे मतलबी वागणे.. यांचाही जागो जागी उद्धार झालाच. या सर्व गदारोळात नेहमीप्रमाणेच एक ठळक मुद्दा वादाचा ठरला. ‘मदर्स डे’ हा आपला सण नाही, मग तो आपण साजरा कां करायचा?  त्याला उत्तर बहुदा हेच होतं, की सण कुणाचा का असेना? आई तर  आपली आहे? मग काय हरकत आहे? मग मुद्दा आला तो ‘मातृदिना’चा. म्हणजे मराठी परंपरेनुसार असलेला श्रावणातला मातृदिन. त्यावर पुन्हा नेहेमीप्रमाणे टीका झाली की, कोणत्याही विषयात ‘आपली संस्कृती’ मध्ये आलीच पाहिजे असा काही नियम आहे कां? (अशाने मग पुरोगामी काका-मावश्यांना भारी राग येतो हो!) एकूण काय.. वादच वाद- आईशप्पत!

या संदर्भात (वैचारिक विधान करण्यापूर्वी हा शब्द हवाच) काही मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. ‘मदर्स डे’ आणि ‘मातृदिन’ ची तुलनाच होऊ शकत नाही. ‘मातृदिन’ हा ‘मनुवादी’ परंपरेने बहुजनांवर लादलेला सण अहे. तर ‘मदर्स डे’ हा एका जागतिक कल्पनेचा ग्लोबल हुंकार आहे. मातृदिन हा फक्त मातेचं महत्त्व सांगतो, पण मदर्स डे हा ‘टू ऑनर द मदरहुड’ असा असतो. यात फारच वैचारिक फरक आहे. मातृदिन म्हणजे भगव्या ङोंडय़ात गुंडाळून आलेला सामाजिक धोका आहे. आणि मदर्स डे ही अमेरिकेच्या ङोंडय़ात गुंडाळून आलेली प्रेमळ भेट आहे. ती हसतमुखाने स्वीकारण्यातच भारताची सामाजिक उन्नती आहे. (मागे एकदा अशा भाषेत फेसबुकवरती पोस्ट टाकली होती. त्यानंतर मला, ‘‘याला उपरोध म्हणतात’’ असं स्वतंत्र डिक्लेरेशन द्यावं लागलं होतं.. असो!)
खरं तर आईची आठवण काढण्यात गैर काहीच नाही ती कोणत्या निमित्ताने काढतोय, हे ही महत्त्वाचं नाही. ती मे महिन्यातल्या दुस:या रविवारी काढली, म्हणून श्रावण अमावस्येला काढायची नाही, असंही काही नाही. केवळ ‘अमेरिकन’ आहे म्हणून मदर्स डे खटकतो, असं तर मुळीच नाही. तो खटकतो, तो त्याला आलेलं सवंग, बाजारू स्वरूप बघून. आणि हा आक्षेप आजचा नाही- पूर्वीचाच आहे. आपल्यापैकी किती जणांना ‘मदर्स डे’चा इतिहास माहिती असेल! ज्या ‘अॅना जार्विस’ या महिलेने अमेरिकेत 1908 साली सर्वप्रथम हा ‘मदर्स डे’ साजरा केला. तिने स्वत:च नंतर, 1923 च्या सुमारास त्याविरुद्ध मोहीम उघडली. कारण असं की, 1920 र्पयत हा ‘मदर्स डे’ इतका पसरला की, हॉलमार्क सारख्या कंपन्यांनी ‘मदर्स डे’ची शेकडो प्रकारची शुभेच्छा पत्रे, भेटवस्तू बाजारात आणल्या ही नफेखोरी, हे व्यापारीकरण बघून अॅना उद्विगA झाली. तिचं म्हणणं होतं, की मी या प्रथेला सुरुवात केली, ती कौटुंबिक स्नेहबंध टिकून रहावेत य उद्देशाने. तिचा आग्रह होता की तुम्ही तुमच्या हस्ताक्षरात एक साधी चिठ्ठी तुमच्या आईला लिहा- पण स्वत: लिहा. विकत आणू नका. या प्रथेचं खाजगी स्वरूप अधोरेखित व्हावं म्हणून अॅनाने चक्क ‘मदर्स डे’ या नावाचा स्वामित्त्व हक्क मिळवला होता. त्यात तिने ‘मदर्स’ लिहिताना षष्ठीवाचक चिन्ह आधी टाकलं (अॅपॉस्ट्रॉफी एस) ते मुद्दाम तसं टाकलं. तिच्या म्हणण्यानुसार हा उत्सव, प्रथा आपल्या घरातल्या, आपल्या आईच्या सन्मानासाठी आहे- एकटीच्या सन्मानासाठी. जगभरच्या आयांसाठी सरसकट कृतज्ञता म्हणून ती नाही. या प्रथेला खाजगी रूपातच राहू द्या!
प्रत्यक्षात असं झालं का? अजिबात नाही. उलटपक्षी या प्रथेचं स्वरूप दिवसेंदिवस अधिकाधिक व्यापारी, सार्वजनिक झालं, ज्या काळी केवळ छापील शुभेच्छापत्र होती, तेव्हा त्यांच्या संख्येवर जरा तरी मर्यादा होती. आता जेव्हा ‘डिजिटल’ शुभेच्छा पत्रांचा जमाना आलाय, तेव्हा तर काही मर्यादाच राहिलेली नाही. ‘‘आई’’ या नावाला ‘एनकॅश’ करताना कोणीही मागे-पुढे पहात नाही, हजारो प्रकारची रंगीबेरंगी शुभेच्छापत्रं, जी.आय.एफ. फाईल्स्, तयार कविता अशा अनेक साधनांनी हा मदर्सडे कमालीचा सवंग, वरवरचा आणि  भावनाशून्य केलाय.
‘‘मी माङया आईवर किती प्रेम करतो किंवा करते’’ हे सा:या जगाला ओरडून सांगण्याचा जाहीर अट्टाहास बघितला की, कुठेतरी शंका येते, आई बरोबर प्रत्यक्षात असलेलं वागणं कुठेतरी बोचतंय, ती बोच कमी करण्याचा हा प्रय} तर नाही?
खरं सांगू? ‘‘जपायचंय.. तुला..’’ असं ठसक्यात म्हणणारी मुलं फक्त जाहिरातीत असतात. प्रत्यक्षात नाही. ख:या आयुष्यात मुलं आपल्या आईला काहीही बोलून न दाखवता जपत असतात. गंमत म्हणजे, अशी मुलं ‘मदर्स डे’ ला फेसबुकवर आईसोबत ‘सेल्फी’ सुद्धा टाकत नाहीत!- अॅड.सुशील अत्रे