शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मातृ दिन विशेष- मुुलांना शिकवून मोठे करायचं-मुक्या व बहिऱ्या उषाबाईला आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 12:22 AM

मुकी बहिरी आहे म्हणून हिंमत न हारता हिमतीने मोलमजुरी करत मुलांना शिकवून मोठे करायचे हे स्वप्न उराशी बाळगले आहे.

प्रमोद ललवाणी

कजगाव, ता.भडगाव : जिद्द व मेहनतीच्या बळावर मुलांना घडविण्यासाठी मुकी व बहिरी असलेल्या कजगाव येथील उषाबाई दीपक सोनवणे या मोलमजुरीची कामे करणाऱ्या मातेने  मनाशी एकच जिद्द बांधली आहे ती म्हणजे मुलांना शिकवून मोठे करणे. अपार कष्ट करून स्वप्न बघणाऱ्या उषाबाईस शासन स्तरावरून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रत्येक ठिकाणी करावी लागते तडजोडस्वत: मुकी व बहिरी यामुळे समाजात हालअपेष्टा होतात. मनाशी बांधलेली स्वप्ने अपंगत्वामुळे साकार होत नाहीत, प्रत्येक ठिकाणी तडजोड करावी लागते. या सर्वच मार्गावरून मार्गक्रमण करत असलेल्या उषाबाई मात्र मुलाच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार करण्यासाठी अपार मेहनत घेत आहे. मुकी बहिरी आहे म्हणून हिंमत न हारता हिमतीने मोलमजुरी करत मुलांना शिकवून मोठे करायचे हे स्वप्न उराशी बाळगले आहे.

उषाबाई जन्मत: मुकी व बहिरी  दोंडाईचा येथील सुदाम इशी यांना एक मुलगा व दोन मुली. यात एक मुलगा व एक मुलगी हे मुके व बहिरे आहेत. यात अजय हा दोंडाईचा येथे सलून दुकान चालवतो तर उषाबाईचे २०१० मध्ये  कजगाव येथील दीपक सोनवणे यांच्याशी लग्न झाले. दीपकची सलूनची लहानशी टपरी. त्यातच उषाबाईकडून लागणारा हातभार. यातूनच संसाराची गाडी बऱ्यापैकी रुळावर आहे. मात्र वाट्टेल ते करून मुलं घडवायची, त्यांना शिक्षण देऊन मोठं करायचं हे ध्येय मनाशी पक्के करत मुकी व बहिरी असलेली उषाबाई साऱ्या गोष्टी इशाऱ्याने सांगते. ही भाषा उषाबाई जेथे काम करते तेथील साऱ्या सदस्यांना अवगत झाली आहे. त्यांचे इशारे साऱ्यांना समजू लागल्याने एक मोठं पाठबळ मिळत आपली भाषा साऱ्याना कळू लागल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसते. तिचे शिक्षण इयत्ता सातवीपर्यंत दोंडाईचा येथील मूकबधिर शाळेत झाले आहे. 

दोन्ही मुलं मुके व बहिरे नसल्याचा आनंदमुकी व बहिरी असली तरी बुद्धिकौशल्यात हुशार असलेल्या उषाबाईस दोन मुलं. एक मुलगा साई तिसरीमध्ये शिकतो तर दुसरा मुलगा गणेश पहिलीमध्ये शिकतोय. दोन्ही मुलं आपल्याप्रमाणे मुके व बहिरे नसल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर कायमच ओसंडून वाहत असतो कारण मुकी व बहिरीच्या वेदना भोगल्या असल्यामुळे दोघे मुले यापासून दूर असल्याचे मोठे समाधान तिच्या चेहऱ्यावर आहे. याच समाधानाच्या बळावर वाट्टेल ते कष्ट करून मुलं घडवायची हिच जिद्द मनाशी बाळगत अपार मेहनत घेत असलेल्या या मातेस शासन स्तरावरून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मदत मिळाल्यास मोठा हातभार लागेल. 

टॅग्स :Mothers Dayमदर्स डेBhadgaon भडगाव