जळगाव : मुलीच्या लग्नात जेवण करीत असलेल्या रत्नप्रभा वासुदेव आंधळे (५० रा. गांधीपुरा, एरंडोल) यांची एक लाख रुपयांचा ऐवज असलेली पर्स लांबविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडे चार वाजता लाडवंजारी मंगल कार्यालयात घडली. दरम्यान, दोन अल्पवयीन मुले सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याच्या शोधार्थ पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान रत्नप्रभा आंधळे या प्रसिध्द कवी वा.ना.आंधळे याच्या पत्नी आहेत. या मंगल कार्यालयातून सलग दुसऱ्या दिवशी बॅग लांबविण्यात आली.कवी प्रा. वा.ना.आंधळे हे पत्नी रत्नप्रभा, मुलगा निखील, मुलगी विशाखा व सायली यांच्यासह एरंडोलला वास्तव्यास आहे. २८ रोजी मुलगी विशाखा हिचा शहरातील लाडवंजारी मंगल कार्यालयात विवाह सोहळा होता. लग्न समारंभ आटोपल्यावर जेवणाचा कार्यक्रम सुरु असताना रत्नप्रभा या विहीनबाई यांना जेवणाचा घास भरविण्यासाठी उठल्या असता, सोबतची पर्स त्यांनी रिकाम्या खुर्चीवर ठेवली. त्याचवेळी पर्स लांबविण्यात आली.त्यात ४ तोळे सोन्याचा नेकलेस,११ ग्रॅमची पोत, ५ ग्रॅमचे सोन्याचे कानातले टॉप्स व ५ हजार रुपये रोख असा एकूण एक लाख रुपये किमतीचा ऐवज पर्समध्ये होता. रत्नप्रभा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.मध्यप्रदेशातील बालकांची टोळीलग्न समारंभात बॅगा लांबविणारी मध्यप्रदेशातील अल्पवयीन मुलांची टोळी सक्रीय आहे. याच मंगल कार्यालयात मंगळवारी सोयगाव तालुक्यातील एका बुट विक्रेत्याची ४२ हजार रुपये रोकड लांबविण्यात आली. त्यानंतर एमआयडीसीतच एका हॉटेलमध्ये महिलेचे ५० हजार रुपये लांबविण्यात आले. या तिन्ही घटनांमध्ये संशयित सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहेत. दोघांना एमआयडीसी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेºयात कैदपर्स लांबविल्याचा प्रकार मंगल कार्यालयातील सीसीटीव्हीत कॅमेºयात कैद झाला आहे. यात नव्या हिरव्या रंगाच्या पट्टे असलेल्या शर्ट चोरट्याने परिधान केला आहे. काही वेळाने तो रत्नप्रभा आंधळे जेवत असताना त्याच्या पाठीमागे उभा आहे तर बाहेर पडतांना व आतमध्ये प्रवेश करतांना दिसून येत आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कांचन काळे, वासुदेव मोरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. सीसीटीव्ही फुटेजनुसार तत्काळ बसस्थानक गाठले. याठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले व दोन ते तीन तरुणांची चौकशी केली.
मुलीच्या लग्नात जेवताना आईचे लाखाचे दागिने लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 12:40 PM