रावसाहेब भोसलेपारोळा, जि.जळगाव : देशावर ओढवलेल्या कोरोनाच्या आपत्तीमुळे अनेक पदाधिकारी, कर्मचारी कौटुंबिक जबाबदाºया पार पाडून त्यांच्या कर्तव्याला प्राधान्य देत आहेत. शिरसमणी, ता.पारोळा येथील कन्या माधुरी शिवनाथ बोरसे या नागपूर येथील खोतवाडी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे घरी एक वर्षाचे बाळ टाकून त्या निरंतर सेवारत आहेत.यापूर्वी त्या भायखळा, मुंबई, जामनेर, जळगाव येथे कार्यरत होत्या. नागपूर येथे शहर पोलीस ठाण्यात अधीक्षक पोलीस इन्स्पेक्टर या पदावर कार्यरत आहेत. मुलाला आई, ममतेची गरज असते. मात्र कोरोना विरुद्ध लढण्यासाठी खाकीतील एक आई आपल्या काळजावर दगड ठेवून कर्तव्य प्राधान्य देत आहेत. एक वर्षाचे बाळ जळगाव येथे पतीकडे सोडून नागपूर येथे नुकत्याच झालेल्या पदोन्नती बदलीमुळे कर्तव्य बजावत आहेत.दरम्यान, आम्ही लहान बाळांना सोडून प्रथम लोकांसाठी बारा- बारा तास रस्त्यावर थांबतो. स्वत:साठी व देशाच्या हितासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरी थांबावे, असे आवाहन त्या जनतेला करतात.
एक वर्षाचे बाळू घरी सोडून माता कोरोना बंदोबस्ताला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 6:34 PM
देशावर ओढवलेल्या कोरोनाच्या आपत्तीमुळे अनेक पदाधिकारी, कर्मचारी कौटुंबिक जबाबदाºया पार पाडून त्यांच्या कर्तव्याला प्राधान्य देत आहेत. शिरसमणी येथील कन्या माधुरी शिवनाथ बोरसे या नागपूर येथील खोतवाडी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
ठळक मुद्देशिरसमणी : महिला पोलीस अधिकाऱ्याचे कर्तव्याला प्राधान्य पदोन्नती बदलीमुळे कर्तव्य