धरणगाव, जि.जळगाव : येथील प.रा.विद्यालयात बालिका दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेत सावित्रींच्या लेकींचा मातृसन्मान सोहळा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी.एन.चौधरी होते. यावेळी मोलमजुरी करणाºया ते सरपंच पदावर आरुढ झालेल्या पालक मातांचा सन्मान करण्यात आला. आपल्या मुला-मुलींमुळे आपला सन्मान होत असल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते.यावेळी मंचावर उपमुख्याध्यापक संजय अमृतकर, पर्यवेक्षक डॉ.संजीवकुमार सोनवणे, माता पालक प्राजक्त शिंदे, सीमा पाटील, विजया सनेर, ज्योती पाटील, सुधा पाटील, रेखा झुंजारराव, शीतल चौटे, भारती पाटील, लता चौधरी आदी मंचावर उपस्थित होते.मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पार्पण केले. प्रास्ताविक शिक्षक बापू शिरसाठ यांनी केले. विविध क्षेत्रात कार्यरत असणाºया माता पालकांचा सन्मान शाळेत शिकत असलेल्या त्यांच्या मुलाने केला. यावेळी अतिशय भावनिक वातावरण निर्माण झाले होते. यावेळी 'हमारी मुठ्ठीमें आकाश सारा, जबभी खुलेगी तो चमकेगा तारा’ हे गीत मुलांना ऐकविले. यावेळी प्राजक्ता शिंदे, सीमा पाटील, विजया सनेर, माळी यांनी मनोगतातून शाळेत राबवित असलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली. मातृृसन्मानाची संकल्पना आवडल्याचे सांगून शाळेप्रती आदरभाव व्यक्त केला.कार्यक्रमात शिक्षिका आशा शिरसाठ, वंदना सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.पूर्वा केले, भाग्यश्री सोनवणे, रेणू राजपुरोहित, पलक कुमट, दिपाली महाजन, तेजेंद्र सूर्यवंशी, दिपाली माळी, भाग्यश्री पाटील या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवन चरित्रावर आधारित तयार केलेल्या पोस्टर्सचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंजली सोनवणे या विद्याथीर्नीने ‘मी सावित्री बोलतेय’ हे एकपात्री नाटक सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या.दुपार सत्रात प्रमुख वक्ते म्हणून वंदना डहाळे यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडला. प्रास्तविक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी सुत्रसंचालन डॉ.वैशाली गालापुरे यांनी तर आभार सुरेखा तावडे यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली.अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापक बी.एन.चौधरी यांनी सावित्रीबाईंची शिक्षणाप्रती असलेली आस्था, जिद्द, चिकाटी विशद करून प्रत्येकाने शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन केले. सकाळ सत्रात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा केले हिने तर आभार कोमल माळी हिने मानले.यशस्वीतेसाठी गोपाल चौधरी, रामचंद्र धनगर, भास्कर कोळी, संजय मोरे, रवींद्र पाटील यांनी सहकार्य केले.
धरणगावात मातृसन्मान सोहळ्यात मोलमजुरी करणाऱ्या मातांना अश्रू झाले अनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 6:38 PM