चाळीसगाव, ता. चाळीसगाव : देवळी येथील नानासाहेब उत्तमराव पाटील आदिवासी आश्रमशाळेच्या भारत चंपालाल पावरा या ११वी शिकणा-या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची मिशन शौर्य अंतर्गत माऊंट एवरेस्ट मोहिमेसाठी अंतीम १२ जणांच्या चमूत निवड झाली आहे. नाशिक विभागातून त्याचा एकमेव समावेश झाला आहे.आदिवासी विकास विभाग मिशन शौर्य राबविते. एवरेस्ट मोहिम यशस्वी करण्यासाठी समावेश झालेल्या गियार्रोहकांना दार्जीलिंग येथे प्रशिक्षण दिले जाते. भारत पावरा हा प्रशिक्षणासाठी रवाना झाला आहे. यावेळी त्याचा संस्थेचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल येथील प्रकल्प अधिकारी आर.बी.हिवाळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनिल चौधरी, सचिन गढे, मुख्याध्यापक जितेंद्र सूर्यवंशी, तुषार खैरनार आदी उपस्थित होते.
‘माऊंट एवरेस्ट’ मोहिमेसाठी चाळीसगाव तालुक्यातील भारत पावराची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 12:26 PM
देवळी आश्रमशाळा
ठळक मुद्दे१२ जणांच्या चमूत समावेशनाशिक विभागातून त्याचा एकमेव समावेश