विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
जळगाव : येथील जयदुर्गा माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लब जळगावतर्फे नुकतेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. योगेंद्र कासट, जितेंद्र ढाके, जयश्री महाजन, माणिकचंद कासट, सरोज कासट, योगेश गांधी, डॉ. तुषार फिरके यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
साफसफाईसाठी कामगारांची संख्या वाढविण्याची मागणी
जळगाव : कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे स्वच्छतेच्या कामकाजावर परिणाम होत आहे. तरी शहरातील १९ प्रभागांमध्ये शहराच्या चतु:सीमेप्रमाणे झाडू कामगार व गटार कामगारांची संख्या वाढवून मिळावी, अशी मागणी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
नळ कनेक्शन मोफत देण्याची मागणी
जळगाव : शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत नागरिकांना अमृत योजनेचे नळ कनेक्शन मोफत देण्यात यावे, तसा प्रस्ताव मनपाने शासनाकडे पाठवावा अशी मागणी करण्यात आली आहे. मोफत नळ कनेक्शन दिल्यावर नागरिकांचा १६ हजार रुपये खर्च वाचणार आहे. त्यामुळे मनपाने जळगावकरांना मोफत नळ कनेक्शन देण्याची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
रेल्वे रोको आंदोलन रद्द
जळगाव : कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे जळगाव स्थानकात रेल रोको आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, रेल रोको आंदोलन हे कायद्याने गुन्हा असल्याचे सांगत रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक चयनसिंग पटेल यांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याने, हे आंदोलन रद्द आले.