भडगाव, जि.जळगाव : महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक कमवि शाळा कृती समितीच्या वतीने नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर ५ आॅगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या भडगाव तालुक्यातील विविध महाविद्यालयातील शिक्षकांच्या वतीने शनिवारी पंचायत समितीत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.तालुक्यातील गेल्या १२ ते १५ वर्षांपासून विनावेतन सेवा बजावणाºया शिक्षकांचा आता संयमाचा बांध फुटत आहे. अनेकवेळा विविध आंदोलन करुनही आतापर्यंत आश्वासन आणि फक्त आश्वासन देऊन ओवाळणी करणाºया शिक्षण विभागाविरुद्ध तसेच त्यांच्या प्रशासनाविरुद्ध उद्रेक होत असून राज्यातील विविध विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांवर विनावेतन अध्यापन करणाºया तसेच बिनपगारी कार्य करणाºया शिक्षकांच्या वतीने विनाअनुदानित उच्च माध्यमिक कमवि शाळा कृती समिती नाशिक विभागार्फे नाशिक येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शाळा कामबंद तसेच एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्र्यांनी याबाबत गांभीर्याने विचार करुन १०० टक्के अनुदान प्राप्त करुन द्यावे ह्या मागणीसाठी उपविभागीय शिक्षण संचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.कृती समितीचे नाशिक विभागीय सचिव एन.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध महाविद्यालयातील शिक्षक प्रेमचंद चौधरी, पी.एन.तायडे, एस.के.कापुरे, एस.एन.पाटील, मयूर सूर्यवंशी, मनोज पाटील, सतीश पाटील, हेमंत भोसले, ए.व्ही.पावरा, जे.पी.राठोड, एस,एम.पाटील, एम.एस.राठोड, आर.बी.पाटील आदी विनाअनुदानित शिक्षक बांधव पंचायत समितीत निवेदन देतेवेळी उपस्थित होते.
विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीतर्फे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 4:13 PM
विनाअनुदानित उच्च माध्यमिक कमवि शाळा कृती समितीच्या वतीने नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर ५ आॅगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या भडगाव तालुक्यातील विविध महाविद्यालयातील शिक्षकांच्या वतीने शनिवारी पंचायत समितीत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देनाशिक येथे ५ आॅगस्ट रोजी होणार आंदोलनत्या पार्श्वभूमीवर भडगाव पंचायत समितीत दिले निवेदन