जळगाव : जिल्हा परिषदेची जुनी इमारत जीर्ण झाल्याने या इमारतीच्या जागी नवीन इमारत उभी करण्यासंदर्भात ठराव मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे़ येत्या ७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा ठराव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडीट झाले आहे़ ही इमारत जीर्ण झाल्याने प्रशासकीय खर्चातून याठिकाणी नवीन इमारत उभारण्याच्या हालचालींना वेग येणार आहे़ दरम्यान, जिल्हा परिषदेकडून बीओटी तत्त्वावर एल आकारात शिवतीर्थ मैदानावर व्यापारी संकुल उभारून यातील दुकाने भाड्याने देण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ जिल्हा परिषदेच्या उत्पन्नता वाढ होण्यासंदर्भात दोन गाळेही व्यावसायिक वापरासाठी देण्यासंदर्भात विचार सुरू असल्याची माहिती मिळाली़कार्यकारी अभियंत्यांकडे असेल लक्षलघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आऱ के़ नाईक यांना कार्यमुक्त करावे, असा ठराव पुन्हा एकदा जलव्यवस्थापन समितीच्या सभेत झाला़ त्यामुळे आगामी सर्वसाधारण सभेत त्याकडे सर्वांचे लक्ष असेल. सदस्यही याबाबत आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत.
जळगाव जि़ प़ ची जुनी इमारत पाडण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:22 PM