ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, दि.4 : शेतक:यांच्या विविध मागण्यांसाठी 5 रोजी महाराष्ट्र बंदच्या हाकेला चाळीसगाव, पाचोरा व तालुक्यातून सहभाग नोंदविण्यात येणार आहे. याचबरोबर शिवसेनेतर्फे रास्तारोकोही केला जात आहे.
संपासोबतच इतर आंदोलनेही होवू लागली असून 4 रोजी रविवार असल्याने बाजार समित्या नेहमी प्रमाणे बंदच होत्या. तर काही दूध सोसायटय़ांवर तसेच खाजगी डेअ:यांवर मात्र शेतक:यांनी दूध विकले. दरम्यान संपाचा परिणाम वाढवत मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कृती समिती, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व विविध संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे. बंद यशस्वी करण्यासाठी 4 रोजी बैठकाही घेण्यात आल्या.
पाचो:यात सेनेतर्फे रास्तारोको
शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी पाचोरा भडगाव शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली. शेतकरी कर्जात होरपळून निघत असतांना केवळ अल्पभूधारक शेतक:यांना कर्जमाफी न देता सर्व शेतक:यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि शासनाची कुंभकर्णी झोप उडावी म्हणून 5 रोजी महाराणा प्रताप चौकात सकाळी 10 वाजता रास्ता रोको केला जाईल. बाजारपेठ बंद करून भाजीपाला गुरांना खाऊ घातला जाईल आणि सरकारचा निषेध व्यक्त करणारे आणि शेतक:यांच्या न्याय्य मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात येईल अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली असून पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व शेतकरी , शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.