शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
2
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
3
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
4
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
5
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
6
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
7
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
8
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
9
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
10
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
11
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
12
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
13
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
14
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
15
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
16
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
17
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
18
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
19
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
20
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज

धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास क्षेत्रासाठी हालचाली :उपवनसंरक्षक दिगंबर पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 1:06 PM

‘लोकमत’ला सदिच्छा भेटीत दिली माहिती

ठळक मुद्दे डोलारखेडा गावाच्या स्थलांतरासाठी प्रयत्न ...तर २०६ एकर जागेत गवतांचे कुरण जंगलावरील भार कमी करण्याचा प्रयत्न

जळगाव : डोलारखेडा परिसरात सद्यस्थितीत ६ वाघांचे अस्तित्व असून एका वाघिणीचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे या भागातील मानवी वावर कमी होण्यासाठी डोलारखेडा गावाने स्थलांतराची तयारी दर्शविली आहे. मात्र स्थलांतर करण्यासाठी हे क्षेत्र किमान ‘धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास क्षेत्र’ (क्रिटीकल टायगर हॅबिटॅट) अथवा अभयारण्य म्हणून घोषित होणे आवश्यक आहे. त्यासाठी वनविभागातर्फे प्रस्ताव देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी ‘लोकमत’ कार्यालयात दिलेल्या भेटीप्रसंगी दिली.‘लोकमत’चेनिवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी झालेल्या चर्चेत पगार यांनी वनविभागाच्या कामाची तसेच भावी योजनांची माहिती दिली.म्हणून ‘धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास क्षेत्रा’साठी प्रयत्न...डोलारखेडा परिसरात वाघांचे अस्तित्व असल्याने व वाघाने हल्ला केल्याच्या घटनेनंतर लोकांनी स्वत:हूनच स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. जोपर्यंत अभयारण्य अथवा नॅशनल पार्क म्हणून हे क्षेत्र घोषित होत नाही, तोपर्यंत शासनाकडून स्थलांतरासाठी निधी उपलब्ध होऊ शकणार नाही. मात्र हे क्षेत्र अभयारण्य घोषित झाल्यास त्याच्या अनेक जाचक अटींच्या त्रासाला परिसरातील नागरिकांना सामोरे जावे लागेल. त्याऐवजी ‘धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास क्षेत्र’ (क्रिटीकल टायगर हॅबिटॅट) म्हणून हे क्षेत्र घोषित झाले तरी स्थलांतराची प्रक्रिया करता येईल व तुलनेत जाचक अटी कमी असतील. त्यामुळे यासाठीचा प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती पगार यांनी दिली. सध्या मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्या प्रयत्नांनी हा परिसर वाघांसाठी संरक्षित वनक्षेत्र (टायगर कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) म्हणून घोषित होऊ शकले. आता या जागेला सलग तारेचे कुंपण (मेटल फेन्सींग) किंवा सोलर कुंपण करण्याचा सुमारे ३३.२० लाखांचा प्रस्ताव शासनाला दिला आहे....तर २०६ एकर जागेत गवतांचे कुरणउपवनसंरक्षक पगार म्हणाले की, डोलारखेडा परिसरातील नागरिकांनी स्वत:हून स्थलांतराची तयारी दर्शविली आहे. ते शक्य झाले तर जंगलाच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेली सुमारे २०६ एकर मानवी वस्ती असलेली जमीन वनविभागाच्या ताब्यात येईल. त्या जागेत तृणभक्षी प्राण्यांसाठी गवताचे कुरण करता येईल. जेणेकरून मांसाहारी प्राण्यांना त्यांचे भक्ष्य जंगलातच उपलब्ध होईल.मृत्यू झालेली वाघीण वृद्ध... उपवनसंरक्षक पगार म्हणाले की, डोलारखेडा परिसरात सद्यस्थितीत ४ मोठे वाघ व २ बछडे असे ६ वाघ आहेत. तर शेतात मृत्यू झालेल्या वाघीणीचे वय १६ ते १७ वर्षे होते. म्हणजेच ती वाघीण वृद्ध होती. तिच्या पायाला झालेली जखम भरली होती, त्यात ‘सेप्टीक’ झालेले नसल्याचे शवविच्छेदन अहवालात आढळून आले आहे. तसेच एक दात तुटला होता. मात्र वृद्धावर हल्ला याच वाघीणीने केला होता का? यासाठी जिथे हल्ला झाला होता, त्या ठिकाणावरून गोळा केलेले वाघाचे केस व मृत्यूझालेल्या वाघीणीचे केस डीएनए चाचणीसाठी पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यावरच हल्ला करणारी हीच वाघीण होती का? हे स्पष्ट होईल. तसेच या वाघीणीच्या मृत्यूच्या चौकशीसाठी अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. त्या चौकशीचा अहवाल आल्यावर त्यात कोणी दोषी आढळल्यास संबंधीतावर कारवाई केली जाईल.जंगलावरील भार कमी करण्याचा प्रयत्नडोलारखेडा वनक्षेत्र हे टायगर कॉन्झर्वेशन रिझर्व्ह म्हणून घोषीत झालेले असल्याने शासनाकडून मिळत असलेल्या निधीतून या जंगलातील पाणवठे कोरडे पडल्यास त्याजागी कृत्रीम पाणवठे तयार करणे, गवताची कुरण करणे, वनबंधारे, सिमेंट बंधारे बांधणे, इंटरप्रिटेशन सेंटर करणे, प्रत्येक गावात युवकांच्या मदतीने वनसंरक्षणाची चळवळ राबविणे, श्यामाप्रसाद मुखर्जी जनधन योजनेंतर्गत गावांना गॅस कनेक्शन तसेच इतर सुविधा पुरविणे आदी कामे करून जंगलावरील या नागरिकांचा भार कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पगार यांनी सांगितले.