नांदेड, ता.धरणगाव, जि.जळगाव : येथील गाव व परिसरात माकडांचा उपद्रव सुरू असून, माकडांना पकडण्यासाठी आलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना हुलकावणी देत आहे.उन्हाळ्यापासून येथे गाव व परिसरात आलेल्या चार-पाच माकडांकडून सारखा उपद्रव सुरू आहे. गुराढोरांसह शेळ्या मेंढ्यांना कडाडून चावा घेऊन रक्तबंबाळ करणे, नागरिकांच्या कानशिलात लगावणे व उभ्या असलेल्या मोटारसायकली लाथेने आडव्या पाडणे असे प्रकार माकडांकडून नित्याचेच सुरू आहेत. याबाबत १० रोजी ‘लोकमत’मध्ये ठळक वृत्त प्रसिद्घ झाल्यानंतर वनविभागाने दखल घेतली.दि.१६ व १७ अशा दोन दिवसांपासून वनविभागाच्या पथकाने सापळे लावून माकडांचा शोध घेतला. परंतु माकडे हाती लागत नाही. यामुळे वनविभागाच्या पथकाला खाली हाताने परतावे लागत आहे.
धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे वनविभागाला माकडांची हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:05 AM
नांदेड येथील गाव व परिसरात माकडांचा उपद्रव आहे.
ठळक मुद्देमाकडांचा सुरू आहे सातत्याने उपद्रवनागरिक कंटाळले