जळगाव : दारू दुकाने सकाळी ८ वाजेपासून उघडता येतील या शासनाच्या निर्णयाचा राष्टÑवादी कॉँग्रेस, युवक कॉँग्रेस व महिला आघाडीतर्फे पदाधिकाऱ्यांनी दारूच्या रिकाम्या बाटल्या फोडून गुरूवारी निषेध केला. यावेळी महिलांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध करणाºया विविध घोषणाही दिल्या.सरकारने आॅनलाईन दारू विक्री तसेच सकाळी ८ वाजेपासून दारू विक्रीची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. याचा शहरी तसेच ग्रामीण भागात विपरीत परिणाम होईल अशी भूमिका पदाधिकाºयांनी यावेळी व्यक्त केली. सरकारच्या या निर्णयाविरोधात पक्षाच्या जिल्हा कार्यालयात सर्व पदाधिकारी एकत्र आले होते.यावेळी सरकारच्या विरोधात विविध घोषणा देत दारूच्या रिकाम्या बाटल्या यावेळी फोडण्यात आल्या. विविध पातळ्यांवर सरकार अपयशी ठरत असून सर्वत्र भिषण दुष्काळी परिस्थिती आहे. नोटाबंदीने शासनाच्याच तिजोरीत पैशांचा खणखटाट आहे. या निर्णयाने सरकारच्या तिजोरीत भर पडेल पण जनतेचा विचार केला जात नसल्याची टीका यावेळी उपस्थित पदाधिकाºयांनी केली.आंदोलनात राष्टÑवादी कॉँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, पक्षाच्या ओबीसी सेलच्या प्रदेश सरचिटणीस सविता बोरसे, राष्टÑवादी युवक कॉँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, जिल्हा उपाध्यक्षा मिनाक्षी चव्हाण, ममता तडवी, लता बाविस्कर, अर्चना कदम, रजनी पाटील, सोनाली देऊळकर, आशा येवले, रोहन सोनवणे, पंकज सोनवणे, तुषार इंगळे, किरण राजपूत, सुशिल इंगळे, कैलास पाटील, कुणाल चौधरी, अर्जुन भारूळे, विनोद सपकाळे, गुणवंत जाधव, मजहर पठाण आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.शासन निर्णयाचा विपरीत परिणाम होणारयानंतर राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन दिले. दारूची दुकाने लवकर सुरू करण्याच्या निर्णयाचे वाईट परिणाम होणार असल्याने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी यावेळी पदाधिकाºयांनी केली.
जळगावात ‘राष्टÑवादी’चे आंदोलन : दारूच्या बाटल्या फोडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:58 PM