लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात ५१ दिवसांपासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा आणि जिल्हा मणियार बिरादरीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. मंगळवारपासून या आंदोलनाला सुरूवात करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक सेलचे माजी अध्यक्ष गफ्फार मलिक, प्रा. प्रीतीलाल पवार, जिल्हा राष्ट्रवादीचे साहिल पटेल, छावा मराठा युवाचे अमोल कोल्हे, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, वंचित बहुजन महिला आघाडी रेखा शिरसाळे ,काँग्रेस महाराष्ट्राचे प्रवक्ते मुफ्ती हारून नदवी ,लोकसंघर्ष मोर्चाचे हरिश्चंद्र सोनवणे ,वंचित बहुजन महिला आघाडीची जिल्हा सचिव फिरोजा शेख यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. यावेळी कर्नाटकातून आलेले काही शेतकरी देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. हे शेतकरी एका ट्रान्सपोर्ट कंपनीतील कामासाठी जळगावला आले होते.
यावेळी आंदोलकांनी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना निवेदन दिले. यांना जुबेदा सैयद,सबनुर बी शेख हैदर, सुलताना बी शेख युनुस, अमिना बी शेख कासम, सैयद हरीश, सैय्यद साबीर यांच्या हस्ते देण्यात आले.