ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 21- अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील तलाठी योगेश रमेश पाटील यांच्यावर 17 जानेवारी रोजी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळाधिका:यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केलेले आंदोलन दुस:या दिवशीही सुरूच होते. तलाठय़ावर हल्ला करणा:यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी जळगाव जिल्हा तलाठी संघाने आज अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान कालपासून तलाठय़ांच्या संपामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल वसूल झालेला नाही. जिल्ह्यातील सुमारे तीनशे तलाठय़ांनी एकत्र येऊन निवेदन दिले.
वरील घटनेच्या निषेधार्थ जिल्हा तलाठी संघातर्फे कालपासून लेखणी बंद सुरू झाले. सर्व तलाठी, मंडळाधिकारी काळ्या फितीलावून आंदोलनात सहभागी झाले. जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 432 तलाठी, 73 मंडलाधिकारी, अव्वल कारकूनांनी लेखणी बंद आंदोलनात सहभाग घेतला. यामुळे अनेक ठिकाणची तहसील कार्यालये आज बंद होती. काही ठिकाणी कार्यालय सुरू होती मात्र तलाठी, मंडलाधिकारी नसल्याने महसूल वसुली, विविध दाखले तयार झाले नाहीत.
संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या हल्ल्याने तलाठी संवर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तलाठी बांधवांचे मनोबल खच्चीकरण झाले आहे. जोपयर्ंत हल्ला करणा:या सर्व संशयितांना अटक होत नाही तो पयर्ंत जिल्हा तलाठी संघ आंदोलन सुरू ठेवणार आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष एन. आर. ठाकूर, सरचिटणीस जे. डी. भंगाळे, कार्याध्यक्ष आर. आर. महाजन, संघटक व्ही. आर. मानकुंबरे, उपाध्यक्ष योगेश पवार, विभागीय उपाध्यक्ष आर. डी. पाटील, महिला प्रतिनिधी मोनिका बडगुजर, तालुकाध्यक्ष वनराज पाटील आदी उपस्थित होते.
अप्पर पोलीस अधीक्षक बच्चनसिंह यांनी अमळनेर पोलीस निरीक्षकांना घटनेबाबत विचारणा केली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने बच्चनसिंह यांनी पोलीस निरीक्षकांची कानउघाडणी केली. आरोपींना त्वरित अटक करण्याचे आदेश दिले. तलाठी संघटनेच्या पदाधिका:यांना संशयितांना अटक करू असे आश्वासन दिल्याचे संघटनेच्या पदाधिका:यांनी सांगितले.