रेल्वेच्या माध्यमातून अवघ्या देशाला जोडणारे शहर म्हणून भुसावळ जंक्शनची ओळख आहे. देशातील बहुतांश सर्वच भागातून गाड्या येथे येत असल्यामुळे विविध भागातून, राज्यातून नागरिक येथे येतात व काही काळ थांबल्यानंतर पुढील प्रवासास येथून रवाना होतात. त्यामुळे प्रचंड गर्दी या रेल्वे स्थानकावर कायमस्वरूपी असते. तर काही परदेशी पर्यटकही येथे येऊन अजिंठा व अन्य पर्यंटनाच्या ठिकाणी रवाना होत असतात.
दहशत संपली, पण...
रेल्वेच्या दृष्टीने महत्त्वाच्या या शहरात गेल्या वर्षी पहिल्या लाटेत व आता दुसऱ्या लाटेत भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. देान लाटेत मिळून येथे आजअखेर १३ हजार २०१ बाधित येथे आढळून आले आहेत. तर ३३५ जणांचा कोेरोनाने बळी घेतला आहे. या लाटेत तर एक वेळ अशी होती, की स्मशानभूमीत मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नव्हती. अंत्यविधीसाठी मृतांच्या नातेवाइकांना शव घेऊन काही तास प्रतीक्षा करावी लागत होती. ही स्थिती भुसावळकरांनी अनुभवली आहे. त्यामुळे आता बाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने एक दिलासादायक चित्र तालुक्यात आहे.
----
पाच दिवसातील बाधित व सक्रिय रुग्ण
३० जून --- ० --- ४७
१ जुलै --- ४----४८
२ जुलै ---१----४६
३ जुलै ---१----४२
४ जुलै ---०---३९
-----
आतापर्यंतचे लसीकरण
कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत आहे; मात्र लसीकरणावरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. तालुक्यात आतापर्यंत पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ४३ हजार ६९१ एवढी आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या १६ हजार ४४५ एवढी आहे. आतापर्यंत एकूण ६० हजार १३६ बाधितांनी लस घेतली आहे. लसीकरण वाढवावे व त्यासाठी केंद्रांची संख्याही वाढवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
-----
नियम पाळले जावेत
कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असली तरी शासनाने ठरवून दिलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी काटेकाेर करणे गरजेचे आहे. यात नागरिकांचाही जास्तीत जास्त सहभाग असणे गरजेेचे आहे. व्यापारी पेठा शनिवार व रविवार बंद असतात; मात्र अन्य दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू असतात. याचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे, तसेच मास्क लावणे, सॅनिटाईझरचा वापर याकडेही नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे असून, यावर पालिका तसेच पोलीस प्रशासनाने काटेकोर पालन करायला लावणे गरजेचे आहे. कारण अनेक ठिकाणी नागरिक अद्यापही मास्क न लावता फिरताना दिसतात. त्यावर गांभीर्याने लक्ष दिले जाणे आवश्यक आहे.