जळगाव/ पारोळा : लोकसभा उमेदवारीसाठी पक्षाने जो निर्णय घेतला तो आपणास मान्य असल्याची प्रतिक्रीया भाजपाचे खासदार ए.टी. पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना व्यक्त केली.ए.टी. पाटील यांना जळगाव लोकसभा मतदार संघाची पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, उमेदवारी मागण्याचा प्रश्नच नव्हता. पहिला विचार हा आपलाच होणे अपेक्षित होते. मात्र अंतिम निर्णय पक्षाचा असतो तो घेण्यात आला. ‘त्यांच्या’ हातात पक्ष संघटना होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळविण्यात यश आले. पक्षावर आपला पूर्ण विश्वास असून पक्षाचा आदेश मान्य आहे.कार्यकर्ते नाराजदरम्यान, पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे, असे भाजपाचे पारोळा तालुकाध्यक्ष अॅड. अतुल मोरे यांनी सांगितले. इतरही समर्थकांमध्ये नाराजी असून या बाबत मात्र कोणीही खुलेपणाने बोलण्यास तयार होत नसल्याचे चित्र आहे.
खासदार ए.टी. पाटील म्हणतात...पक्षादेश मान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 11:33 AM