जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशाळा व संलग्नित महाविद्यालयातील एम.एस्सी. (सर्व विषय) आणि एम.ए. (भूगोल) प्रथम वर्ष या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची पहिली फेरी २२ व २३ डिसेंबर रोजी होणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर झालेल्या प्रवेश फेरीच्या यादीतील संबंधित विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालय/प्रशाळेत मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे.सोमवारी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांची नावे व त्यांना देण्यात आलेले महाविद्यालये, प्रशाळेची यादी जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे ही कळविण्यात आले आहे. या यादीप्रमाणे संबंधित विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, प्रशाळेत मूळ कागदपत्रे व त्याच्या छायांकित प्रती घेऊन स्वत: हजर राहणे आवश्यक असणार आहे. प्रवेश शुल्क ऑनलाइन स्वीकारले जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी डेबिट कार्ड अथवा नेट बँकिगचा तपशील सोबत ठेवणे आवश्यक असल्याचे प्रवेश समितीचे अध्यक्ष प्रा.ए.बी. चौधरी यांनी सांगितले.
मंगळवारपासून एम.एस्सी, एम.ए. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रथम फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 9:52 PM