कृती समिती : शासनाकडून मागण्यांबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी महावितरणच्या कृती समितीतर्फे गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले कामबंद आंदोलन सोमवारी सायंकाळी स्थगित करण्यात आले. सरकारने कृती समितीच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून त्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे कृती समितीचे जळगाव विभागाचे पदाधिकारी पराग चौधरी व वीरेंद्रसिंग पाटील यांनी दिली.
कोरोनाच्या भयावह परिस्थितीतही काम करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा देण्यासह विविध मागण्यांसाठी कृती समितीने कामबंद आंदोलन पुकारले होते. अखेर आंदोलनाच्या आठव्या दिवशी कृती समितीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ऊर्जा विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह तिन्ही कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी चर्चा केली.
यावेळी मोहन शर्मा, कृष्णा भोयर, जयप्रकाश होळीकर, शकंर पहाडे, रवी बारई, आर. टी. देवकांत, केदार रेळेकर, संजय ठाकूर, सय्यद जहिरोद्दीन, देवीदास देवकांते, दत्तात्रय गुट्टे, संदीप वंजारी आदी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.