वाघडू, ता. चाळीसगाव : हातले वीज उपकेंद्रांतर्गत मान्सूनपूर्व कामांना हातलेसह वाघडू या परिसरात सुरुवात झाली आहे. उंच वाढत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे, फुटलेले पिन आणि इन्सुलेटर बदलणे, तपासणी व दुरुस्त करणे, रोहित्रांचे ऑइल तपासणी, ऑइल गळती थांबवणे, वाहिनींचे खराब झालेले लाइटनिंग अरेस्टर बदली करणे, भूमिगत वाहिन्यांचे तात्पुरते असलेले जॉइंट कायमस्वरूपी करणे, वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदली, जीर्ण झालेल्या वायर बदलणे, जळालेल्या, तुटलेल्या वायर बदलणे, उपकेंद्रातील सर्व यांत्रिक बाबींची व यंत्रणा यांची तपासणी करणे व त्याची दुरुस्ती करणे अशा प्रकारची अनेक कामे गतीने केली जातात. मात्र ही कामे गतीने करीत असताना काही काळासाठी वीजपुरवठा खंडित केला जातो. कर्मचाऱ्यांना कोविड अनुषंगाने उपाययोजना व सुरक्षितता बाळगून ही कामे योग्य ती काळजी घेऊन गतीने केली जात आहेत. देखभाल दुरुस्तीची कामे वीज यंत्रणेच्या हिताची तसेच अखंडित, सुरळीत व सुरक्षित ग्राहक सेवेसाठी असून, तरी ग्राहकांनी या काळात थोडासा संयम राखून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:13 AM