कुंदन पाटील/आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.९ - ‘सरगम’ म्हणजे संगीत... कुठला सूर कुठल्या सुरात मिसळेल आणि नवीच लय तयार होईल, हे बरेचदा नियतीच्या हाती असतं. ‘सरगम’चं कथानकही असंच होतंङ्घ डफलीवाला नायक ‘ती’च्यासाठी दिल्या वचनानुसार वरसंशोधन करीत असतो आणि ‘तिने’ डफलीवाल्यालाच वरलेलं असतंङ्घ तिला ‘जुबान’ नसतेङ्घ काश्मिरातील पहलगामच्या ‘जुबीना’ची कथा जरा वेगळी. काश्मिरातील चारचौघींसारखाच जुबीनाचा चेहराही सफरचंदी लालभडक गालङ्घ अन् त्यावर झुलणारे काळेभोर केस... काश्मिरातल्या देदिप्यमान निसर्गाशी जणू तिच्या निरागस सौंदयार्ची स्पर्धा. अवघी तेरा वर्षांची होती, जेव्हा तिला इथंल्या निसगार्ची दृष्ट लागली. वर्ष २००३ आक्रोड पाडण्याचा हंगाम म्हणजे पहलगाम परिसरातली एक आगळीच धूम. जुबीना झाडाच्या शेंड्याला पोहोचलेली होती. जुबीनाला फांदी-फांदीचा सराव होता, अगदी खारुताई जशी, पण तो दिवस तिच्या या कौशल्याचा नव्हताच. अचानक आभाळ फाटलं. वाराही सैराट सुटला नेमकी तिच्या पायाखालची फांदी तुटली. पडताना गर्भाशयात शिरली.आक्रोडाचे भरघोस पीक दिलेल्या जमिनीवर जुबीना पडलेली होती. कधीही न उजवणारी कुस घेऊन. डॉक्टरांच्या एका डोळ्यात आसू तर दुसºया डोळ्यात हसू होतं...ङ्घ ‘अल्लाह का शुक्र हैं. बच्ची बच गयी, पर मुआफ करना बच्ची की बच्चेदानी को हम नहीं बचा सके. अब वो कभी माँ नहीं बन सकती.’ तिथं मुलगी तेरा-चौदा वर्षांची झाली, की पैगाम यायला (स्थळं यायला) सुरवात होतेच. ‘जुबां-दर-जुबां’ जुबीनाची गोष्ट पहलगामभर पसरली. कसले येणार मग पैगामङ्घ बालसखी आणि चुलतबहीणही (काकांची लेक) असलेली मुबीना जुबीनाच्या दु:खात बुडालेली. मुबीनाची ‘मुहब्बत’ हाच जुबीनाच्या जगण्यातला आनंद होताङ्घ पुढे मुबीनाला ‘पैगाम’ आला. तिचा निकाह झाला. वर्ष २००९. फयाद अहमद हे तिचे ‘शरिक-ए-हयात’ झाले. ‘शरिक-ए-हयात’ म्हणजे आयुष्याचे जोडीदारङ्घनिकाहनाम्यावर दस्तखत झाले. या दस्तखतने फयाद नखशिखांत मुबीनाचा झालेला होता. नियती मात्र पुढे फयादच्या दोन ‘किश्त’ करणार आहे. अगदी बालपणातल्या त्या संत्र्याच्या गोळीसारख्या, हे मुबीनाच्या गावीही नव्हतंङ्घ फयाद अहमद टॅक्सी चालवतो...मी सहकुटुंब काश्मिरला गेलो आणि फयादची भेट झाली. फयादची उर्दू सफाईदार. बोलण्या-वागण्यात कमालीची अदब. फयाद म्हणजे जणू ‘बज्म-ए-उर्दू-अदब’ फयादचे अब्बू पर्यटन खात्यात नोकरीला होते. काश्मिरचा जर्राजर्रा म्हणूनच फयादला तोंडपाठङ्घकाश्मिरच्या इतिहासाचाही गाढा अभ्यासङ्घकुराणातल्या बºयाच आयती फयादला मुखोद्गत, पण तो गीताही जाणतो. कुठल्या अध्यायात काय आहे आणि तेच कुराणातही कसे आलेले आहे, हे छान आणि खुलासेवार सांगतो. करप्शन त्याला अजिबात आवडत नाही. तिथले पोलिसही म्हणूनच की काय त्याच्यापासून दोन हात लांबच राहतात. मुबीनाचा आणि त्याचा संसार छान चाललेला होता. सुमैया आणि सुहेब ही फुलंही या संसारवेलीवर उमललेली. थोडक्यात फयादचे घर म्हणजे ‘जश्न-ए-बहार’च होते. फयादची एकच खंत होती, ती म्हणजे ‘जुबीना’. मुबीनाच्या घरी हिचं येणं-जाणं होतंच. जुबीनाचे हात पिवळे व्हावेत, असं जसं मुबीनाला वाटत होतं, तसंच फयादलाही वाटत होतं. जुबीनासाठी पैगाम येत तर नव्हतेच, पण तिच्या वतीने फयादनं नेलेल्या पैगामांनाही शून्य प्रतिसाद. फयादने कितीतरी उंबरे झिजवले, पण न उजवणारी कुस कुणालाही नको होती.ङ्घ जुबीना आणि फयादमधला संवाद वाढीला लागलेला होता. मुबीनाला आता हे सगळे खटकायला लागलेले होते. पण, जुबीनाचे दु:खही झेलवत नव्हतं. जुबीनासाठी फयादने नेलेला असाच एक आणखी पैगाम ठोकरला गेला. फयाद घरी परतला. मुबीना दारावरच होती. फयादही थबकला. दोघांच्या मध्ये काही काळ स्थिरावली एक निशब्द छटा. फयादनेच मग ही कोंडी फोडली. फयादच्या जडावलेल्या जिभेतून तो निर्णायक फैसला फुटला. फयाद म्हणाला, ‘‘जुबीना तो उम्रभर किसी की माँ नही बन सकती, पर मेरी समझमें नहीं आता, कि बिवी क्यो नही बन सकती? मैने फैसला कर लिया है, कि उसे बिवी बना के रहूंगा.’’ मुबीना भेदरली. गोंधळली. क्षणभर आक्रोडाच्या ‘त्या’ फांदीसारखी मुबीनाची गत झाली. पण पुढे तीच जुबीनाला सावरणारी जमीन बनलीङ्घ जुबीनाचा पायही आता फयाद नावाच्या फांदीवर होता. वर्ष २०१२. फयाद आता सारखाच ‘शरिक’ होता मुबीना व जुबीनच्या ‘हयाती’तङ्घ वर्ष २०१८ङ्घसुहेब मुबीनाच्या कडेवर आणि सुमैया जुबीनाच्या कडेवरङ्घ आमच्या सोबत फयाद. सुहेब, सुमैया दोघांना उद्देशून आपल्या खास उर्दू अदबमध्ये म्हणतो, ‘बच्चो चाचा को खुदा हाफिज बोलो, बोलो फिर आना धरती की इस जन्नतमें’. आणि या अदबमध्ये जणू विरून गेलेला असतोङ्घ विघटनवाद म्हणूनच मुबीना आणि जुबीनासोबत फयाजचा संसार पहेलगामच्या सौंदर्याएवढाच तोलाचा आणि मोलाचा ठरलाय....!!!