१६ जूलै रोजी सभा
जळगाव : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे १६ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही सभा मात्र, ऑनलाईन की ऑफलाईन याबाबत सद्य स्थितीत संभ्रमाचे वातावरण आहे. सद्यस्थितीत शासकीय कार्यालयात ५० टक्के उपस्थितीचे निर्बंध लावण्यात आले आहे.
६५ रुग्ण आयसीयूमध्ये
जळगाव: कोरोनाचे ६५ रुग्ण हे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. ही संख्या घटली असून मध्यंतरी ही संख्या ७०० पर्यंत पोहोचली होती. ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्याही कमी झाली असून यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्याही ४० पेक्षा कमी झाली आहे.
पेव्हर ब्लॉकचे काम सुरू
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कक्ष क्रमांक एक समोर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या बाजुला रस्ता असून आपात्कालीन कक्षाकडे जाण्यासाठी ही व्यवस्था करण्यात येत आहे. या ठिकाणी पूर्णत: कोविड उपचार सुरू असून नॉन कोविडसाठी आपात्कालीन उपचारांची कक्ष एकमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.