- विजयकुमार सैतवालजळगाव - ऐन काढणीच्या हंगामात झालेल्या गारपिटीमुळे मुगाच्या पिकाला फटका बसून उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाजारपेठेत मूगडाळीची आवक घटल्याने भाव ५०० ते ६०० रुपये प्रति क्विंटलने वाढून ७,००० ते ७,३०० रुपये झाली आहे.केवळ ६० दिवसांचे पीक असलेल्या मुगास यंदा सलग पाणी मिळाले नाही, त्यातच गारपिटीमुळे जवळपास ३० ते ३५ टक्के उत्पादन घटले. २५ ते ३० टक्क्यांनी मागणी वाढली असताना आवक कमी झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील मालाबरोबरच मराठवाडा व विदर्भातून येणाऱ्या मुगाचीही आवक कमी झाली आहे. एरव्ही सर्वाधिक मागणी असलेल्या तूरडाळीला मूगडाळीने भावात मागे टाकले आहे. तूरडाळ ६,००० ते ६,४०० रुपये असताना, मूगडाळीचे भाव ७,००० ते ७,३०० वर पोहोचले आहे.उत्पादनावर परिणाम झाल्याने बाजारपेठेत डाळींची आवक कमी आहे. मूगडाळीचे भाव ५०० ते ६०० रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष,ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन
मूगडाळ क्विंटलमागे ६०० रुपयांनी वधारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 3:56 AM