जळगाव : जिल्ह्यात सध्या कोरोनानंतर समोर आलेल्या म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या संख्येने समोर आले आहेत. त्यामुळे भारत विकास परिषद आणि संपर्क फाउंडेशनतर्फे ५ ते १८ जून या कालावधीत म्युकरमायकोसिस निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात डॉ. अनिता भोळे, डॉ. ललित पाटील, डॉ. माधुरी पाटील, डॉ. गोविंद मंत्री, डॉ. प्रशांत चोपडा, डॉ. राहुल चौधरी, डॉ. राहुल मयूर, डॉ. दिनेश अग्रवाल, डॉ. धीरज बडाले, डॉ. शीतल अग्रवाल यांचा समावेश आहे. कोविडच्या नियमांचे पालन करून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नोंदणी आणि माहितीसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत संपर्क फाउंडेशनच्या कार्यालय, टुरिस्ट कॉम्प्लेक्स नेहरू चौक येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरात इच्छुकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष उज्ज्वल चौधरी, सचिव डॉ. योगेश पाटील, प्रकल्प प्रमुख उमेश पाटील, तुषार तोतला, डॉ. सुरेश अग्रवाल, सचिन चोरडिया यांनी केले आहे.