उचंदा, ता मुक्ताईनगर, जि.जळगाव : मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंंबाला सव्वालाख व किशोरी काकडे यांच्या कुटुंबाला मुक्ताईनगर तालुक्यातील मराठा समाजाने आर्थिक मदत दिली.समाजासाठी काहीतरी करावे व त्यात प्रत्येकाचा सिंहाचा वाटा राहावा यासाठी उचंदा, शेमळदे, खामखेडा, धामणदे, पुरनाड आदीसह संपूर्र्ण तालुक्यातील मराठा समाजातील तरुणांनी सलग दोन महिने प्रत्येक गावागावात जाऊन मदतनिधी यात्रा काढून निधी जमा केला.संपुर्ण तालुकाभरातुन मराठा समाजतील तरुणांनी तनमन धनाने सहभाग घेतला. जमा झालेला निधी ३ रोजी रक्कम रुपये एक लाख ११ हजार रुपये हुतात्मा काकासाहेब शिंदे (रा.कानड, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद) यांच्या परिवाराकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच ५१ हजार रुपये शिवकन्या किशोरी बबन काकडे (रा.कापूरवाडी, जि.अहमदनगर) यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला.मदत निधी सुपुर्द करते वेळी यु.डी.पाटील, पवनराजे पाटील, साहेबराव पाटील, कैलास मोसे, निवृती पाटील, विकास पाटील, प्रदीप पाटील, जगदीश पाटील, विनोद सोनवणे, एन.आर.पाटील, राहुल पाटील, प्रदीप धामोळे, श्रीकांत पाटील, संतोष पाटील, अरुण पाटील, संदीप पाटील, कल्पेश पाटील, दीपक पाटील, अभय देशमुख, लोकेश पाटील, गणेश पाटील, गोपाळ पाटील, सुशांत ठाकरे, नीलेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मुक्ताईनगरातील मराठा समाजातर्फे हुतात्मा काकासाहेब शिंदे परिवाराला मदत निधी सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 7:20 PM