मुक्ताईनगर, जि.जळगाव :'तुझे दर्शन झाले आता।जातो माघारी पंढरीनाथा ।।'अशी सावळ्या विठ्ठलास आळवणी करून आषाढी वारी सोहळ्यानिमित्त द्वादशीला पांडुरंगाची हृदय भेट घेतल्यानंतर संत मुक्ताई पालखीने जड अंत:करणाने पंढरीचा निरोप घेतला. परंपरेप्रमाणे दरवर्षी पौर्णिमेपर्यंत पंढरीत मुक्कामी राहणाऱ्या मुक्ताई पालखी सोहळ्याला यंदा कोरोना महामारी संकटामुळे पौर्णिमेच्या तीन दिवसअगोदर पंढरी सोडावी लागल्याचे याचे दु:ख आहे.दशमीला रात्री संत मुक्ताई पालखीने पंढरपुरात प्रवेश केला होता. आषाढी एकादशीच्या दिवशी मुक्ताई पादुकांचे चंद्रभागा स्नान घडले होते. यानंतर लगेच पालखीने नगर प्रदक्षिणा पूर्ण करीत पांडुरंगाच्या कळसाचे दर्शन घेतले होते.द्वादशीला पांडुरंगाची भेटपांडुरंगाच्या भेटीसाठी आतूर असलेल्या पालखी सोहळ्याला प्रशासनाकडून द्वादशीला गुरुवारी सकाळी ११ वाजता विठुरायाच्या दरबारात विठ्ठलाच्या भेटीची वेळ मिळाली. निर्धारित वेळेवर संत मुक्ताईचा हा पालखी सोहळा मुक्ताई पादुकांसह आपल्या २० वारकऱ्यांसोबत विठुरायाच्या दरबारात पोहोचला. यावेळी बहू प्रतिक्षित श्री विठ्ठल आणि मुक्ताईची हृद्य भेट घडली आणि मुक्ताईकडील नैवेद्य विठुरायाला दाखवत श्री विठ्ठलाचा पालखीने निरोप घेतला.परतीचा प्रवासश्री विठ्ठलाचा निरोप घेतल्यानंतर गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुक्ताई मठापासून संत मुक्ताई पालखीने परतीचा प्रवास सुरू केला आहे. मध्यरात्री बाराच्या सुमारास पालखीचे मूळ स्थानी मुक्ताईनग र(कोथळी) येथे परतीचे आगमन होणार आहे.
मुक्ताई पादुकांना गुरुवारी सकाळी अकराला झाले पांडुरंगाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 3:24 PM
परंपरेप्रमाणे दरवर्षी पौर्णिमेपर्यंत पंढरीत मुक्कामी राहणाऱ्या मुक्ताई पालखी सोहळ्याला यंदा कोरोना महामारी संकटामुळे पौर्णिमेच्या तीन दिवसअगोदर पंढरी सोडावी लागल्याचे याचे दु:ख आहे.
ठळक मुद्देद्वादशीला घडली मुक्ताई श्री विठ्ठलाची भेटपौर्णिमेअगोदर सोडली पंढरीमध्यरात्री पोहोचणार मुक्ताईनगरात